पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) काही दिवसांपूर्वी G-7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इटलीमध्ये गेले होते. या दौऱ्यात मोदींनी पोप फान्सिस यांची भेट घेतली. मोदी आणि पोप यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजला. हा फोटो शेअर करुन मोदींवर टीका करणाऱ्या केरळ काँग्रेसवर स्पष्टीकरण देण्याची आणि माफी मागण्याची वेळ आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेसची काय झाली चूक?
केरळ काँग्रेसनं पंतप्रधान मोदी आणि पोप यांच्या भेटीचा फोटो शेअर त्यामध्ये पंतप्रधांनावर टीका केली होती. 'अखेर पोपना देवाला भेटण्याची संधी मिळाली' असं कॅप्शन केरळ काँग्रेसनं केली होती. केरळ भाजपानं या ट्विटवर आक्षे्प घेत काँग्रेसनं ख्रिश्चन समाजालाचा अपमान केल्याचा दावा केला.
'काँग्रेसनं या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी यांची तुलना प्रभू येशूंशी केली आहे. हे संपूर्णपणे अवास्तव येशूंना दैवत समजणाऱ्या ख्रिश्चन समाजाचा अपमान करणारे आहे. काँग्रेसनं ही पातळी गाठणे लज्जास्पद आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते जॉर्ज कुरियन यांनी केलं होतं.
काँग्रेसचं स्पष्टीकरण काय?
केरळ काँग्रेसनं भाजपाच्या या टिकेनंतर स्पष्टीकरण देणारं ट्विट करत ख्रिश्नचन समाजाची माफी मागितली आहे. 'काँग्रेस पक्ष कधीही कोणता धर्म, धार्मिक समुदाय तसंच धार्मिक पुजारींचा अपमान करत नाही, हे सर्व देशाला माहिती आहे. आम्ही सर्व धर्माला सोबत घेऊन वाटचाल करतो. जगभरातील ख्रिश्चन ज्यांना देव समजतात अशा पोप यांचा अपमान करण्याचा विचार कोणताही काँग्रेस कार्यकर्ता कधी करु शकत नाही.
( नक्की वाचा : कोण आहेत जॉर्जिया मेलोनी? मेलोनींबाबतच्या 'या' आहेत 10 रंजक गोष्टी )
मात्र, स्वत:ला देव म्हणवून या देशातील आस्तिकांचा अपमान करणाऱ्या नरेंद्र मोदींची थट्टा करण्यात काँग्रेसला अजिबात संकोच नाही. मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ख्रिश्चनांबद्दल खरंच प्रेम असेल तर मणिपूरमध्ये चर्चची जाळपोळ करणाऱ्यांबद्दलही त्यांनी बोलावं आणि त्यांची माफी मागावी. आमच्या पोस्टमध्ये कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो.