छत्तीसगड-गडचिरोली या पट्ट्यात सरकारकडून नक्षलवाद विरोधी मोहीम राबवली जात आहे. यामध्ये नक्षलवाद्यांचे अड्डे शोधून नष्ट केले जात आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यात कित्येक नक्षलवाद्यांचा कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. काही आठवड्यांपूर्वी नक्षलवाद्यांनी शांततेचा प्रस्ताव पुढे केला होता. मात्र याबाबत सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नव्हती. त्यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्याची हत्या केल्याचा भयंकर घटना उघडकीस आली आहे. काल 11 मेच्या मध्यरात्री काही नक्षलवाद्यांनी काँग्रेस कार्यकर्ता नागा भंडारीची अत्यंत निघृणपणे हत्या केली. बिजापूर जिल्ह्याच्या मारुडबाकातील लिंगापूरमध्ये ही हत्या करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
नक्षलवाद्यांच्या या कृत्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस खबऱ्या म्हणून त्यांची हत्या करण्यात आली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील बैनपल्ली गावचे उपसरपंच मुचाकी रामा यांची हत्या केली होती. त्यानंतर आता नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे.