ज्येष्ठ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. पित्रोदा यांनी मागच्या महिन्यात अमेरिकेतील वारसा कराचा मुद्दा उपस्थित करत नवा वाद सुरु केला होता. या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. काँग्रेसला मित्रपक्षातूनही या मुद्यावर कुणी पाठिंबा दिला नाही. अखेर काँग्रेसला ते पित्रोदा यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत सारवासारव करावी लागली होती. हा वाद शांत होण्याच्या आगोदरच पित्रोदा यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.
( नक्की वाचा : 'काँग्रेसची लूट जिंदगी के बाद भी...' Inheritance Tax च्या मुद्यावर पंतप्रधानांचा हल्लाबोल )
पित्रोदा यांनी 'स्टेट्समन' ला दिलेल्या मुलाखातीमध्ये भारताचं वर्णन वैविध्यपूर्ण देश असं केलंय. भारतामधील पूर्वेतील लोकं चायनीज लोकांसारखे, पश्चिमेतील अरब, उत्तरेतील गोरे आणि दक्षिण भारतामधील लोकं आफ्रिकन व्यक्तींसारखे दिसतात, असं वक्तव्य केलंय.
पित्रोदा यांच्या या वक्तव्यावरुन राजकारण चांगलंच पेटलंय. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यांनी पित्रोदा यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. 'सॅम भाई मी ईशान्य भारतामधला आहे. मी भारतीय व्यक्तीसारखा दिसतो. आपला देश वैविध्यपूर्ण आहे. आमची चेहरेपट्टी वेगळी असली तर आम्ही सर्व एक आहोत. आपल्या देशाच्या बाबतीत थोडं समजून घ्या' अशी पोस्ट सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलाय.
अभिनेत्री आणि भाजपाची लोकसभा उमेदवार कंगना रनौतनंही सॅम पित्रोदा यांच्यावर टीका केलीय. पित्रोदा हे राहुल गांधी याचे मेंटॉर आहेत. त्यांची भारतीय लोकांबाबतच ऐका. संपूर्ण काँग्रेस पक्षाची विचारधारा ही 'फोडा आणि राज्य करा' आहे, अशी टीका कंगनानं केलीय. भाजपा नेते शहजाद पूनावाला यांनीही पित्रोदा यांचं वक्तव्य हे 'धक्कादायक, घृणास्पद आणि तिरकारयुक्त' असल्याचं म्हंटलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पित्रोदा हे राहुल गांधी यांचे मेंटॉर आहेत. त्यांनी सुरुवातीला भारतीयांची जात, धर्म आणि भाषेच्या आधारावर विभागणी केली. त्यानंतर ते भारत विरुद्ध भारत असा वाद निर्माण करत आहेत. काँग्रेसच्या 'मोहब्बत की दुकान' मध्ये तिरस्कार आणि वंशवादाचे सामान आहे, असा टोला पूनावाला यांनी लगावला.
( नक्की वाचा : वडिलोपार्जित संपत्ती सरकारजमा करणारा अमेरिकेतील वारसा कायदा काय आहे? )
दरम्यान, काँग्रेस पक्षानं पित्रोदा यांच्या वक्तव्यावरुन हात झटकले आहेत. पित्रोदा यांची वक्तव्य ही नेहमीच पक्षाचं मत असेल असं नाही, असं ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केलंय.