धानोरकर, वडेट्टीवार वादामुळे काँग्रेस नेते अलर्ट झाले, वाद मिटवण्यासाठी दिल्लीत बैठक

या बैठकीला प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवारांसह काँग्रेसचे संघटक सरचिटणीस केसी वेणुगोपाल, राज्य प्रभारी रमेश चेन्निथला हे उपस्थित होते.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे

काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद सोडवण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दिल्लीमध्ये हा वाद मिटवण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली होती. या दोन नेत्यांमधील वाद संपवण्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवारांसह काँग्रेसचे संघटक सरचिटणीस केसी वेणुगोपाल, राज्य प्रभारी रमेश चेन्निथला हे उपस्थित होते. हा वाद चिघळला तर आगामी विधानसभा निवडणुतीमध्ये काँग्रेसला फटका बसू शकतो ही भीती वाटू लागल्याने हा वाद क्षमवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. 

हे ही वाचा : ...तर मोदी सरकार कोसळेल', बड्या नेत्याचा बडा दावा का?

धानोरकर आणि वडेट्टीवारांमधील वाद नेमका काय आहे ?

या दोघांमधील वाद लोकसभा निवडणुकीपासून सुरू झाला होता. प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर हे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या होत्या.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकरांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आणि त्या जिंकल्याही. मात्र इथून त्यांना उमेदवारी देण्याऐवजी आपल्या मुलीला उमेदवारी मिळावी यासाठी विजय वडेट्टीवारांनी बरेच प्रयत्न केले होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नव्हते. निवडणुकीपूर्वी प्रतिभा धानोरकर यांनी पक्षातल्या नेत्यांनी त्रास दिल्याने आपल्या पतीचे निधन झाल्याचा आरोप केला होता. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

हे ही वाचा : यांना कोणी आवरेल का? काँग्रेस खासदारानंतर आता भाजप आमदाराची पूरग्रस्त भागात स्टंटबाजी

प्रतिभा धानोरकरांचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर वडेट्टीवारांनी त्यांच्यासोबत एका मंचावर येणे टाळले होते.  हा वाद सुरू असतानाच प्रतिभा धानोरकरांनी विधान केले की ब्रम्हपुरीतून पक्ष न पाहाता फक्त कुणबी उमेदवारच निवडून द्या.  धानोरकरांनी अप्रत्यक्षरित्या वडेट्टीवारांना पराभूत करा असे आवाहन केल्याचे यानिमित्ताने चर्चा सुरू झाली आहे. या मतदारसंघातून कुणबी उमेदवारच द्यावा अशी मागणी भाजप आमदार परिणय फुके यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली होती.    

Topics mentioned in this article