भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. भंडाऱ्यात सध्या पूर स्थिती आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या भागाचा दौरा करत आहेत. या दौऱ्या दरम्यान स्टंटबाजी करण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यात काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांचा पूरग्रस्त भागात गाडीच्या बोनेटवर बसून स्टंट करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता भाजपचे तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा ही पूरग्रस्त भागात स्टंट करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विजय रहांगडाले हे भाजपचे तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे आमदार आहेत. त्यांचा देखील एक स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आला आहे. मागील तीन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या घरातील जीवन उपयोगी साहित्य पूरात वाहून गेले आहे.
ट्रेंडिंग बातमी - पूरग्रस्तभागात काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी, व्हिडीओ तुफान व्हायरल
याच नुकसानीची पाहणी करायला गेलेले खासदार प्रशांत पडोळे यांनी कारच्या बोनटवर बसून स्टंटबाजी केली होती. हा प्रकरण ताजा असतानाच तिरोडा गोरेगाव विधानसभेचे भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांनी चक्क ट्रॅक्टरवर बसून व्हिडीओ बनवला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होताना दिसत आहे. तर लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त नागरिकांना सांत्वन देण्याकरिता जातात की त्यांची थट्टा करायला जातात हा प्रश्न या निमित्ताने अधोरेखित झाला आहे. शिवाय पडोळे यांच्या नंतर भाजप आमदार विजय रहांगडाले यांच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'आम्हाला बांबू लावायचं काम सुरू' सर्वां समोर अजित पवार असं का म्हणाले?
भंडाऱ्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे हे आले होते. त्यावेळी त्यांनी गाडीच्या बोनेटवर बसत, स्टंटबाजी केली आहे. त्याचा व्हिडीओ त्यांच्या कार्यकर्त्यांनीच काढला आहे. नंतर हा व्हिडीओ व्हायरलही झाला आहे. या व्हिडीओत खासदारांची गाडी दिसत आहे. ज्या भागातून गाडी येत आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. अशा स्थितीत खासदार गाडीच्या बोनेटवर बसले आहेत. त्यानंतर ही गाडी भरधाव वेगाने त्या पाण्यातून पुढे जात आहे. त्याचा हा व्हिडीओ आता समोर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world