कॉलेजमधील मशीद आणि परिसरावर वक्फ बोर्डाचा दावा, वाराणसीत नवा वाद उफाळला

कॉलेज परिसरातील मशिदीची जागा आणि कॉलेज ज्या जमिनीवर उभे आहे ती सगळी जमीन टोंकच्या नवाबाने वक्फ बोर्डाला दान दिली होती. याच दाव्याच्या आधारे वक्फ बोर्डाने ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केलाय

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

वाराणसीतील एका कॉलेज परिसरात उभ्या करण्यात आलेल्या मशिदीवरून वाद निर्माण झाला आहे. या मशिदीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. वाराणसीतल्या उदय प्रताप कॉलेजचा परिसर आणि त्यासमोरची जमीन यावर वक्फ बोर्डाने हा दावा सांगितले आहे. हा दावा कॉलेज प्रशासनाने खोटा असल्याचे म्हटले आहे. या कॉलेजला 2018 साली एक नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये दावा करण्यात आला होता की कॉलेज परिसरातील मशिदीची जागा आणि कॉलेज ज्या जमिनीवर उभे आहे ती सगळी जमीन टोंकच्या नवाबाने वक्फ बोर्डाला दान दिली होती. याच दाव्याच्या आधारे वक्फ बोर्डाने ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केला असल्याचे कॉलेजचे मुख्याध्यापक डी.के.सिंह यांनी म्हटले आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिंह यांनी म्हटले की वक्फ बोर्डातर्फे कॉलेज प्रशासनाला वसीम अहमद यांनी नोटीस पाठवली होती. त्या नोटीसला कॉलेज प्रसासनाने तेव्हाच उत्तर दिले होते. यात म्हटले होते की कॉलेज परिसरात उभी करण्यात आलेली मशीद ही बेकायदेशीररित्या उभारण्यात आली आहे ज्या जागेवर ही मशीद उभी आहे ती जागा कोणीही खरेदी करू शकत नाही आणि कोणी विकूही शकत नाही. या मशिदीमध्ये 2022 साली वक्फ बोर्डाने बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता जो कॉलेज प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने हाणून पाडला होता. मशिदीसाठीची वीज ही चोरून वापरली जात असून कॉलेजमधूनच या विजेची चोरी होत असल्याचं कॉलेज प्रशासनाने म्हटले आहे.  

Advertisement

नक्की वाचा : शिव्या द्याल तर 500 रूपये दंड! 'या' ग्रामसभेच्या ठरावाची राज्यभर चर्चा

पोलीस उपायुक्त (वरुणा झोन) चंद्रकांत मीणा यांनी सदर प्रकाराबाबत बोलताना म्हटले की हा सगळा प्रकार 2 वर्षांपूर्वीचा आहे.  2022 मध्ये कॉलेज प्रशासनाच्या तक्रारीवरून मशिदीचे बांधकाम थांबवण्यात आले होते. मशिदीत नमाजासाठी येणाऱ्या मनूर रहमान यांचे म्हणणे आहे की , वक्फ बोर्डाने मशीद आणि त्यासमोरील काही एकर जागेवर दावा केला आहे. ही मशीद टोंकच्या नवाबाची मालमत्ता  की, मशीद ही नवाब टोंकची मालमत्ता आहे. मशिदीसाठीची वीज जोडणी कॉलेजच्या सहकार्यानेच करण्यात आली होती असेही रहमान यांचे म्हणणे आहे. 

Advertisement

प्रशासनाने वीज कापल्याचा आरोप

रहमान यांचे म्हणणे आहे की मशिदीकडे वीजपुरवठ्यासाठीची आवश्यक ती सगळी कागदपत्रे आहेत. जो वाद आहे तो उगाच निर्माण केला जात असल्याचाही आरोप रहमान यांनी केला आहे. टोंक नवाबाच्या काळापासून इथे नमाज अदा केली जाते. या कॉलेजची स्थापना राजर्षी उदय प्रताप सिंह जुदेव यांनी केली होती. 1909 मध्ये जुदेव यांनी वाराणसीमध्ये हिवेट क्षत्रिय हायस्कूलची स्थापना केली होती. 1921 पर्यंत हे विद्यालय कॉलेजमध्ये रुपांतरीत झाले. या कॉलेजला नुकतीच 115 वर्षे पूर्ण झाली असून या सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. 
 

Advertisement
Topics mentioned in this article