
महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायती त्यांच्या ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयामुळे चर्चेत राहील्या आहेत. जे निर्णय सरकारला ही घेता आले नाही असे निर्णय राज्यातल्या ग्रामपंचायतींनी घेतले आहेत. असा एक निर्णय आता अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा या ग्रामपंचायतीने घेतला आहे. हे गाव नेसासे तालुक्यात येते. गावात भांडणं झाल्यावर अनेक जण शिव्यांचा वापर करतात. आई- बहीणींवर शिव्या देतात. याला पायबंद घालण्यासाठी ग्रामसभेने मोठा निर्णय घेतला आहे. यातून महिलांचा सन्मान करण्याची भावना ग्रामपंचायतीची असल्याचे सरपंचांनी सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सौंगाळा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत एक ठराव घेतला आहे. या ठरावा नुसार गावात जर का कोणी शिवी दिली तर त्याला 500 रूपयांचा दंड केला जाईल. अनेक वेळा भांडणं झाल्यानंतर कारण नसताना आई बहिणींवरून शिव्या दिल्या जातात. त्यात आई बहीणींची चुकी नसताना असे अपशब्द वापरले जातात. हे टाळले जावे यासाठी ग्रामसभेना हा निर्णय घेतल्याचे सरपंच शरद अरगडे यांनी सांगितले. यातून शिव्या देणाऱ्यांना पायबंद बसेल. शिवाय एक शिस्तही लागेल. महिलांचा सन्मानही राखला जाईल असं त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदेंच्या गावातल्या गावकऱ्यांना काय वाटतं?
मुंबईपासून जवळपास 300 किलोमिटर हे गाव आहे. या गावाने या आधीही अनेक चांगले निर्णय ग्रामसभेत घेतले आहेत. शिव्या देताना आई बहीण यांना निशाणा केलं जातं. हे योग्य नाही. जे लोक अशी भाषा वापरतात, ते शिव्या देताना कोणताही विचार करत नाहीत. त्यांना त्यावेळी आपल्या घरातही आई बहीणी आहेत याचा विसर पडतो. त्यामुळे गावात शिव्या देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर असं कुणी केलं तर त्याला 500 रूपये दंडही आकारला जाईल अशा ठराव मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रेंडिंग बातमी - 'EVM मध्ये घोटाळा, त्यामुळे महायुतीचा विजय' युतीतल्या माजी नेत्याचा खळबळजनक दावा
गावात राहाणाऱ्या महिलांच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठी हा निर्णय घेतल्याचे सरपंच शरद अरगडे यांनी सांगितले.या गावाने अनेक चांगले निर्णय या आधी ही घेतले आहेत. गावात विधवा महिलांना धार्मिक कार्यक्रमात, उत्सवात मानाचे स्थान दिले जाते. ते या कार्यक्रमात सहभागी होतात असा निर्णयही घेण्यात आला आहे. शिवाय पतीच्या मृत्यू नंतर कुंकु न लावणे, मंगळसुत्र गळ्यात न घालणे, बांगड्या न घालणे या गोष्टींवर बंदी आहे.
आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात हे गाव आहे. 2011 च्या जनगणने नुसार या गावाची लोकसंख्या ही 1800 आहे. हे गाव तंटामुक्त गाव आहे. तसा पुरस्कारही या गावाला मिळाला आहे. यागावाने नेहमीच समाजाचा आणि गावाचा विकास पाहिला आहे. त्या दृष्टीने चांगले निर्णयही केले आहेत. गावाची ही ग्रामपंचायतीला चांगली साथ लाभली आहे. त्यामुळे आतापर्यंत चांगले निर्णय झाले आहेत. त्याचे कौतूक ही संपूर्ण राज्यात झाले आहे. आता त्यांच्या या नव्या निर्णयाची चर्चाही संपूर्ण राज्यात होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world