कोविशील्ड लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दाम्पत्याचा आरोप; अ‍ॅस्ट्राजेनेका कंपनीविरोधात आक्रमक

एका दाम्पत्याने त्यांच्या मुलीचा कोविशील्ड लसीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

कोरोना महामारीच्या काळात अनेकांना दिलासा दिलेली कोविशील्ड लस सध्या तिच्या साईड इफेक्टमुळे चर्चेत आहे. मात्र आता पुन्हा एकदा ही लस एका नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. एका दाम्पत्याने त्यांच्या मुलीचा कोविशील्ड लसीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. या दाम्पत्याने ब्रिटनची फार्मा कंपनी अॅस्ट्राजेनेकाबाबत तक्रार करण्याचीही तयारी सुरु केली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काही दिवसांपूर्वीची कोविशील्ड लस बनवण्याऱ्या कंपनीने ब्रिटनच्या कोर्टात सांगितलं होतं की, ज्यांनी कुणी कोविशील्ड लस घेतली आहे त्यांना ब्लड क्लॉट डिसऑर्डरचा धोका निर्माण होऊ शकतो. भारतात सीरम इन्स्टिट्युटने या लसीची निर्मिती केली होती. लस निर्मितीसाठी अॅस्ट्राजेनेका कंपनीचाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता.   

(नक्की वाचा - कोविशील्ड लस घेतलेल्यांनी घाबरुन जाऊ नका; सीरम इन्स्टिट्युटने साईड इफेक्ट्सबाबत आधीच दिली होती माहिती)

कोविशील्ड लसीमुळे 2021 मध्ये आपल्या 20 वर्षीय मुलीने जीव गमावल्याचा आरोप वेणुगोपालन गोविंदन यांनी केला आहे. या दरम्यान अनेकांना या लसीमुळे आपला जीव गमावावा लागला, असंही त्यांनी म्हटलं. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, या लसीमुळे रक्ताच्या गाठी होण्याची समस्या होती. 15 युरोपीयन देशाने यावर बंदी घातली. तेव्हाच सीरम इन्स्टिट्युटने या लसीची निर्मिती थांबवायला हवी होती. 

सार्वजनिक आरोग्याच्या नावाखाली सुरु असलेल्या या घटनाची पुनरावृत्ती रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचं आहे. तसं झालं नाही तर आम्ही या विरोधात तक्रार करु. आमच्यासोबत आणखी आठ कुटुंबदेखील आहेत, ज्यांच्यासोबत असं घटलंय, असं गोविंदन यांनी म्हटलं. 

Advertisement

(नक्की वाचा- कोव्हिशिल्ड लसीमुळे Heart Attack चा धोका? वाचा कंपनीनं कोर्टात काय सांगितलं)

फार्मा कंपनी अॅस्ट्राजेनेकाविरोधात ब्रिटनच्या उच्च न्यायालयात अशी 51 प्रकरणे सुरु आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की या लसीमुळे लोकांचा मृत्यू झाला आहे. कंपनीने देखील रक्ताच्या गाठी होण्याचा धोका असल्याचं मान्य केलं आहे. पीडितांच्या नातेवाईकांनी आता भरपाईची मागणी केली आहे. मात्र कंपनीने यासाठी विरोध केला आहे. 

Topics mentioned in this article