जाहिरात
This Article is From Apr 30, 2024

कोविशील्ड लस घेतलेल्यांनी घाबरुन जाऊ नका; सीरम इन्स्टिट्युटने साईड इफेक्ट्सबाबत आधीच दिली होती माहिती

सीरम इन्स्टिट्यूटने 19 ऑगस्ट 2021 रोजी कोविशील्डमुळे होणाऱ्या साईड इफेक्ट्सची माहिती आपल्या वेबसाईटवर टाकली होती. 

कोविशील्ड लस घेतलेल्यांनी घाबरुन जाऊ नका; सीरम इन्स्टिट्युटने साईड इफेक्ट्सबाबत आधीच दिली होती माहिती

कोरोना काळात अत्यंत प्रभावी ठरलेल्या कोविशील्ड वॅक्सिनच्या साईड इफेक्ट्सची सध्या जगभरात चर्चा आहे. फार्मा कंपनी अॅस्ट्राजेनेका कोविशील्ड वॅक्सिनच्या धक्कादायक अशा साईड इफेक्ट्सची माहिती ब्रिटनमधील न्यायालयात दिली आहे. या वॅक्सिनमुळे थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोमची समस्या होण्याचा धोका आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबतची माहिती समोर आल्यानंतर कोविशील्ड वॅक्सिन घेतलेल्या अनेकांची चिंता वाढली आहे. मात्र कोविशील्डचं उत्पादन करणारी कंपनी सीरम इन्स्टिट्युटने याबाबतची माहिती तीन वर्षांपूर्वीच आपल्या वेबसाईटवर दिली होती. सीरम इन्स्टिट्यूटने 19 ऑगस्ट 2021 रोजी कोविशील्डमुळे होणाऱ्या साईड इफेक्ट्सची माहिती आपल्या वेबसाईटवर टाकली होती. 

(नक्की वाचा- कोव्हिशिल्ड लसीमुळे Heart Attack चा धोका? वाचा कंपनीनं कोर्टात काय सांगितलं)

सीरम इन्स्टिट्युटने याबाबत आधीच सांगितलं होतं की, थ्रोम्बोसायटोपीनिया किंवा प्लेटलेट्सची संख्या यामुळे कमी होऊ शकते. याशिवाय ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता आहे. ही समस्या 1 लाखांमधील एका व्यक्तीला होण्याची शक्यता असून ही समस्या दुर्मिळ असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. 

कोविशील्ड वॅक्सिनमुळे कोणते साईड इफेक्ट्स होऊ शकतात?

सीरम इन्स्टिस्ट्युटनुसार, कोविशील्ड वॅक्सिनमुळे शुद्ध हरपणे, चक्कर येणे असा त्रास होऊ शकतो. हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल, धाप लागले, श्वास घेताना शिटी वाजल्यासारखा आवाज येणे, ओठ, चेहरा किंवा गळ्यााल सूज येणे, अशा समस्या देखील जाणवू शकतात. 

( नक्की वाचा : हातगुण कुणाचा चांगला? महिला डॉक्टरांचा की पुरुष डॉक्टरांचा; संशोधनातून मोठा खुलासा )

लसीकरणानंतर एक समस्या जास्त जाणवू शकते, ती म्हणजे सांधेदुखी, डोकेदुखी, थरकाप होणे. अशा स्थितीत आपल्या डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्यावा. या समस्या 10 पैकी एका व्यक्तीला जाणवू शकते, असं कंपनीने म्हटलं आहे. लसीकरणानंतर इंजेक्शन टोचलेल्या ठिकाणी लाल होणे, सूज येणे, ताप येणे, उलटी किंवा जुलाबाचा त्रास होणे, सर्दी, खोकला येणे अशा समस्या देखील काही काळ उद्भवू शकतात.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com