
Couple Shocking Video Viral : रेल्वे ट्रॅकवर जीव धोक्यात टाकून रिल्स बनवणाऱ्या कपल्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ट्रेकिंग असो किंवा प्रवासादरम्यान काही लोक जीवघेणी स्टंटबाजी करून रिल्स बनवतात आणि स्वत:ला मृत्यूच्या दारात ओढतात. आताही एका कपलचा असाच एक धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. एका मोठ्या रेल्वे पुलावर रिल बनवण्यासाठी एका कपलने त्यांच्या जीव धोक्यात टाकला. समोरून वंदे भारत एक्स्प्रेस येत असतानाच त्यांनी रिल बनवलं, पण पुढे जे काही घडलं ते पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.
या कपलचा रेल्वे ट्रॅकवरचा खरतनाक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून त्यांना चांगलच सुनावलं आहे. या कपल विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही लोकांनी केली आहे. हा व्हिडीओ एखाद्या सामान्य रेल्वे ट्रॅकवर बनवण्यात आला नाहीय. तर या व्हिडीओला शूट करण्यासाठी रेल्वेच्या मोठ्या ओव्हरब्रिजचा वापर करण्यात आला आहे. एका कपलने धावत्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या समोरच हे रिल बनवून स्वत:चा जीव धोक्यात टाकला.
कपलसोबत त्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ
या व्हिडीओची शूटिंग अचानक करण्यात आली नाहीय. तर पूर्ण प्लॅनिंग करून या कपलने हा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोकांच्या मस्तकाची आग तळपायात गेली आहे. कारण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या कपलचा चांगलाच समाचार घेतला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक कपल रेल्वे ट्रॅकवर रिल्स बनवत असतं, त्याचदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस त्यांच्या बाजूने सुसाट जाते. त्यावेळी दोघांचेही केस हवेत उडतात आणि त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण होतं. पण वंदे भारत एक्स्प्रेस त्या कपलच्या जवळून धावते, सुदैवाने दोघांचा जीव वाचतो.
🚨 For a few seconds of social media fame, people are now risking their lives. Dancing on active Railway Bridges with trains speeding right behind them.
— Gems (@gemsofbabus_) October 10, 2025
One Slip, One gust of Wind… and it's Over. 🤦♂️ pic.twitter.com/uyifgZBw6Q
कपलचा हा व्हिडीओ @gemsofbabus नावाच्या यूजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत म्हटलंय,सोशल मीडियावर काही सेकंदाच्या प्रसिद्धीसाठी काही लोक त्यांच्या जीव धोक्यात टाकतात. रेल्वे पूलावर नाचत आहेत आणि त्यांच्या मागे ट्रेन सुसाट धावते. एक चूक अन् हवेचा झोका आणि सर्वाचा द एंड..या व्हिडीओला आतापर्यंत 42 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. लोकांनीही या व्हिडीओला प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world