Haryana Tau Viral Video: बहुतांश वेळेस तुम्ही इंटरनेटवर प्रसिद्ध यू-ट्युबर अरमान मलिकच्या दोन लग्नांची चर्चा ऐकली असेल पण हरियाणातील या काकांनी तर सोशल मीडियावर धुरळाच उडवलाय. सध्या इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालणाऱ्या या काकांनी एक नव्हे तर चक्क दोन-दोन लग्न केली आहेत. दोनदा लग्न आणि त्यात जोडीदाराच्या वयामध्ये इतकं मोठं अंतर आहे की सोशल मीडियावर लोक म्हणतायेत की, "याला तर सुपरहिट चित्रपटाचा सीक्वेलच म्हणावं लागेल" ट्रोलिंग आणि प्रेम यांचा मसाला असलेला हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
हरियाणातील काकांनी केले दोनदा लग्न, पण का... (Indian age gap marriage)
रीलची सुरुवात होते माइक, प्रश्न आणि हसू...आणि मग असं उत्तर ऐकायला मिळालं की कमेंट सेक्शनमध्ये अक्षरशः भूकंप आलाय. हरियाणातील एक वयोवृद्ध व्यक्ती आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा हा व्हिडीओ केवळ व्हायरल झाला नाहीय तर लोकांची मानसिकता, वयातील अंतर आणि प्रेम निभावणं यासारख्या मुद्यांवरही चर्चा सुरू झालीय. kusum_goyat_1 नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आलेला व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की,"हरियाणातील काकांची दोन लग्न" आणि इथूनच चर्चा - ट्रोल्सची सरबत्ती सुरू झालीय.
वयातील अंतर, पण उत्तरांमध्ये बेधडकपणा (Age gap marriage viral reel)
व्हिडीओमधील महिला म्हणतेय की, लोक चुकीचे कमेंट करतात, पण जर मला सेटिंगच करायची असती तर मी आधीच केली असती. त्यांच्या उत्तरात बेधडकपणा आणि आत्मसन्मानही दिसतोय. काकांनीही सांगितलं की, त्यांचं पहिलं लग्न झालं तेव्हा त्यांची दुसरी पत्नी केवळ सात-आठ महिन्यांची असेल.
(नक्की वाचा: Viral Video: जगातील सर्वात महागड्या हॉटेलची लई भारी झलक, एका रात्रीचे भाडे 22 लाख रूपये, आतून कसं दिसतं हॉटेल?)

जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, लोक तुम्हाला सासरा-सून म्हणतायेत, तेव्हा वाईट वाटत नाही का? यावर महिला उत्तर देते, "नाही वाटत… चांगले कमेंट करा, उत्पन्नही मिळतं." हे विधान आजच्या सोशल मीडिया संस्कृतीवरही प्रश्न उपस्थित करतं, जेथे ट्रोलिंग अनेकदा कंटेंट क्रीएटर्ससाठी कमाईचं साधन ठरतंय.
(नक्की वाचा: Viral News: गाणं वाजू द्या! 800 रुपयांचं लॉलीपॉप कि म्युझिक प्लेअर? खाताच कानामध्ये वाजू लागतंय गाणं)
हा विषय फक्त दोन लग्नांचा किंवा वयातील अंतराचा नाहीय. तर आजच्या डिजिटल युगात नातेसंबंधांबाबत समाजाची मानसिकता, ट्रोलिंग आणि व्हायरल होण्याची काय किंमत आहे, या गोष्टीही दर्शवतंय. प्रेम, पसंती आणि कौटुंबिक निर्णयांवर सार्वजनिक मत किती प्रभाव टाकतंय, हे देखील दिसतंय. एकूणच प्रत्येक व्हायरल व्हिडीओमागे फक्त सनसनाटी माहिती नसते तर समाजाचं प्रतिबिंबही दिसतं.
NOTE: NDTV या व्हिडीओची पुष्टी करत नाही
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world