
- राजस्थान की सेंट्रल यूनिवर्सिटी की लैब में भारतीय करेंसी नोटों पर खतरनाक फंगस और बैक्टीरिया पाए गए हैं.
- नोटों पर पाए गए फंगस में पेनीसिलियम, क्लेडोस्पोरियम, फ्यूजेरियम, एस्परजिलस और ट्राइकोडर्मा शामिल हैं.
- नोट कॉटन पेपर से बने होते हैं जो नमी को सोखते हैं और बैक्टीरिया तथा फंगस के पनपने का कारण बनते हैं.
Fungus-Bacteria on Indian Currency Notes: आपल्या खिशात आणि पाकिटात असलेल्या भारतीय चलनी नोटा केवळ देवाणघेवाणीचे साधन नाहीत, तर त्या अनेक धोकादायक रोगांचे वाहकही असू शकतात. राजस्थानमधील किशनगड येथील सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थानच्या बायोटेक्नॉलॉजी लॅबमध्ये झालेल्या एका संशोधनातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. या संशोधनानुसार, विशेषतः 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांवर संसर्गाचा धोका जास्त आढळला आहे. NDTV ने या रिसर्चसाठी दूधवाले, पाणीपुरी विक्रेते, दुकाने, रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स आणि पेट्रोल पंप यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांहून या नोटा गोळा केल्या होत्या.
राजस्थानच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या बायोटेक्नॉलॉजी लॅबमध्ये या गोळा केलेल्या नोटांचे परीक्षण करण्यात आले. या चाचण्यांमध्ये नोटांवर 5 प्रकारचे धोकादायक फंगस - पेनीसिलियम, क्लेडोस्पोरियम, फ्यूजेरियम, एस्परजिलस आणि ट्राइकोडर्मा सापडले. याशिवाय, 4 प्रकारचे बॅक्टेरिया - ई.कोलाई, स्टॅफिलोकोकस, क्लेबसिएला आणि स्यूडोमोनास देखील आढळले आहेत, जे अनेक गंभीर रोगांना कारणीभूत ठरू शकतात.
(नक्की वाचा- Pune News: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदललं, महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय)
नोटांवर बॅक्टेरिया का वाढतात?
तज्ज्ञांनुसार, चलनी नोटा कॉटन पेपरपासून बनलेल्या असतात. हा कागद लवकर ओलावा शोषून घेतो आणि चिकटही होतो, ज्यामुळे त्यावर बॅक्टेरिया आणि फंगस सहजपणे वाढतात. अनेक लोक नोटा मोजताना थुंकीचा वापर करतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका आणखी वाढतो. या सूक्ष्मजीवांमुळे डोळ्यांचा संसर्ग, फुफ्फुसांचे आजार आणि क्षयरोग (TB) सारखे गंभीर रोग पसरू शकतात.
सेंट्रल युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर डॉ. जयकांत आणि असिस्टंट प्रोफेसर डॉ. जन्मेजय यांनी सांगितले की, फंगल स्पोर 3 ते 4 वर्षांपर्यंत टिकून राहू शकतात, तर क्षयरोगाचे बॅक्टेरिया 24 ते 48 तास नोटांवर जिवंत राहतात. या काळात जर ही नोट कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आली, तर रोग थेट पसरू शकतो.
संशोधन कसं करण्यात आलं?
संशोधन करणाऱ्या टीमने सांगितले की, ही तपासणी प्रक्रिया खूपच कठोर होती. नोटांना आधी सॅनिटाइज्ड कॉटनने स्वच्छ करण्यात आले आणि नंतर लॅमिनर फ्लोहुडमध्ये संक्रमण-रहित वातावरणात त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ठोस एगर प्लेट्सवर ठेवून 37 डिग्री तापमानात 8 ते 9 तास इनक्यूबेटरमध्ये ठेवले. त्यानंतर काही वेळातच बॅक्टेरिया दिसून आला.
(नक्की वाचा- चर्चा तर होणारच! एकच लाडू मिळाला म्हणून थेट मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार)
हे संशोधन केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगभरातील लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. 2017 मध्ये प्लॉस वन जर्नलमध्ये न्यूयॉर्कमधील चलनी नोटांवर झालेल्या संशोधनातही असेच परिणाम समोर आले होते. त्या संशोधनातही असे सूक्ष्मजीव सापडले होते, जे त्वचेचे रोग, मुरुम आणि गंभीर संसर्गाचे कारण बनू शकतात.
डिजिटल पेमेंटचा वापर आवश्यक
तज्ज्ञांनी नागरिकांना रोख रक्कम वापरताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. शक्य असल्यास वारंवार हात धुवावे, नोटा मोजताना थुंकीचा वापर करण्याची सवय सोडून द्यावी आणि जास्तीत जास्त डिजिटल पेमेंटचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या खिशात असलेले पैसे कधी आपल्याला कोणत्या मोठ्या आजाराचे शिकार बनवतील, हे सांगता येत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world