जाहिरात

चर्चा तर होणारच! एकच लाडू मिळाला म्हणून थेट मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार

तक्रारीमुळे पंचायत समितीमध्ये एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी पंचायत समितीने बाजारातून 1 किलो मिठाई विकत घेऊन तक्रारदाराची माफी मागण्याचा निर्णय घेतला आहे.

चर्चा तर होणारच! एकच लाडू मिळाला म्हणून थेट मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार
  • Villager in Madhya Pradesh's Bhind received one laddu instead of two during Independence Day event
  • He called Chief Minister's Helpline to complain about sweet distribution
  • Panchayat decided to buy sweets and apologise to resolve the complaint
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Madhya Pradesh News : एकच लाडू मिळाला म्हणून पठ्ठ्याने थेट मुख्यमंत्री हेल्पलाईनवर फोन केल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील हा प्रकार आहे. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रमतर उपस्थित सर्वांना लाडू वाटप केले जात होते. यावेळी कमलेश खुशवाहा नावाच्या एका ग्रामस्थाला एक लाडू देण्यात आला, पण त्याला दोन लाडू हवे होते. जेव्हा त्याला दुसरा लाडू देण्यास नकार दिला गेला, तेव्हा त्याने पंचायत भवनाच्या बाहेरूनच थेट मुख्यमंत्री हेल्पलाइनवर फोन लावून आपली तक्रार नोंदवली.

त्याने आपल्या तक्रारीत म्हटलं की, 'ग्रामपंचायतीने ध्वजारोहणानंतर योग्य प्रकारे मिठाईचे वाटप केले नाही आणि या प्रकरणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पंचायत सचिव रवींद्र श्रीवास्तव यांनी या घटनेची पुष्टी केली. त्यांनी NDTV ला सांगितलं की, "तो ग्रामस्थ बाहेर रस्त्यावर उभा होता. शिपायाने त्याला एक लाडू दिला, पण तो दोन लाडूंसाठी आग्रह धरत होता. जेव्हा त्याला नकार दिला, तेव्हा त्याने थेट मुख्यमंत्री हेल्पलाइनवर फोन केला."

(नक्की वाचा-  Pune News: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदललं, महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय)

या तक्रारीमुळे पंचायत समितीमध्ये एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी पंचायत समितीने बाजारातून 1 किलो मिठाई विकत घेऊन तक्रारदाराची माफी मागण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे शासकीय यंत्रणांवरचा ताण आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या लहान-सहान गैरसमजांचे गंभीर परिणाम समोर आले आहेत.

( नक्की वाचा : Home Loan : तुमचा EMI कमी होणार, 'या' बँकांनी कमी केले व्याज दर, इथे करा चेक )

या घटनेची तुलना जानेवारी 2020 मधील एका घटनेशी केली जात आहे. त्याच जिल्ह्यातील एका ग्रामस्थाने खराब हँडपंपची तक्रार केली होती. त्यावेळी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता पी.आर. गोयल यांनी तक्रारीच्या उत्तरात तक्रारदाराला ‘वेडा' म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे मोठा गदारोळ झाला होता, ज्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती. नंतर त्यांनी आपले आयडीचा गैरवापर झाल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com