देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली तरी अजूनही जातीच्या चौकटीतून काही जण बाहेर पडण्याच्या तयारीत नाहीत. अशीच लाजिरवाणी घटना मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील चौरई गावात घडली आहे. इथं एका दलित तरुणाच्या लग्नाची वरात घोडागाडीतून काढणं महागात पडलं आहे. गावातल्या ठाकूर समाजातील काही लोकांना हे आवडलं नाही. या ठाकूरांनी वराती दरम्यान काही गडबड केली नाही. पण वरात झाल्यानंतर घोडागाडी चालकाबरोबर या ठाकूरांनी भयंकर कृत्य केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दलित तरुणाची वरात घोडागाडीतून काढायची नाही असा दम गावातल्या ठाकूरांनी दिला होता. पण स्थानिक नेत्यांनी घोडागाडी चालकांना विश्वासात घेतले होते. शिवाय वरातीसाठी घोडागाडी देण्यास सांगितलं होतं. तुम्हाला संरक्षण देवू असं आश्वासनही दिलं होतं. त्यामुळे दलित तरूणाच्या वरातीसाठी घोडागाडी देण्यात आली. त्यानुसार घोडागाडी चालक राहुल रजक, जगदीश आणि कृष्णा रजक यांनी घोडागाडी दिली.
ट्रेंडिंग बातमी - 40 पानांची चिठ्ठी, तासाभराचा VIDEO; पत्नीच्या छळामुळे इंजिनिअरने संपवले जीवन
याचा रागा गावातल्या ठाकूरांनी मनात ठेवला. त्यांनी वरातीमध्ये कोणतीही गडबड केली नाही. वरात जावू दिली. वरात संपवून ज्यावेळी घोडागाडी चालक राहुल रजक, जगदीश आणि कृष्णा रजक हे परत येत होते. त्यावेळी त्यांना गावातल्या ठाकूरांनी गाठलं. त्यानंतर त्यांना बेदम चोप देण्यात आला. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जखमींनी सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - 6 महिन्यापूर्वी लग्न केलं, संसारासाठी 2000 चं लोन काढलं, पुढे मात्र भयंकर घडलं
दमोह जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही जातीयवाद मोठ्या प्रमाणात मानला जातो. शिवाय दलित कुटुंबांनी घोडागाडीवरून वरात काढण्यात या भागात अघोषित बंदी आहे. अनेक वेळा अशा वराती रोखल्या गेल्या आहेत. अनेक वेळा यातून वादही निर्माण झाले आहेत. ज्यांना मारहाण झाली आहे त्यांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनीही केवळ आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world