जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रोपेगेंडार युद्ध सुरू झालं आहे. जगभरात आपली प्रतिमा स्वच्छ असल्याचं आणि भारतातील वातावरण बिघडवण्यासाठी पाकिस्तानातील नेते प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानातील न्यूज चॅनल्स आणि यूट्युब चॅनल्सच्या माध्यमातून पाकिस्तान कुरघोड्या करत आहे.
भारताने पाकिस्तानच्या या प्रोपेगेंडा वॉरवर अटॅक केला आहे. भारताविरुद्ध दुष्प्रचार करणाऱ्या पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि यूट्युब चॅनवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे. भारतात अशा 16 चॅनल्सवर सरकारने बंदीची कारवाई केली आहे.
कोणते पाकिस्तानी न्यूज आणि यूट्युब चॅनल्स बॅन?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) बैठकीत भारतातने सिंधु जल कराराला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रीयांना सांगितलं की, सिंधु कराराला सध्या स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आहे. भारत-पाकिस्तानातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.