
Rajnath Singh Speech : पहलगाम हल्ल्याच्या बदल्यासाठी पाकिस्तानविरोधात भारतीय लष्कराच्या'ऑपरेशन सिंदूर'नंतर गुजरातमधील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भूज एअरबेसवर पोहोचले होते. हवाई दलाच्या जवानांच्या साहसा आणि शौर्याचा कौतुक करून त्यांचा मनोबल वाढवलं. दहशतवादाविरुद्धची ही कारवाई आपल्या हवाई दलाच्या नेतृत्वाखाली झाली. राजनाथ सिंह यांनी यावेळी पाकिस्तानवर निशाणा साधला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तान विरुद्धच्या लष्कराच्या कारवाईची उल्लेख करताना राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. जे काही झालं तो फक्त ट्रेलर होता. योग्य वेळ येईल तेव्हा पिचर दाखवू. ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुम्ही जे काही केले त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
श्ता करायला वेळ लागतो तितक्यात तुम्ही शत्रूंना गुंडाळलं
भारतीय हवाई दलासाठी, पाकिस्तानी भूमीवर वाढणाऱ्या दहशतवादाला चिरडून टाकण्यासाठी फक्त 23 मिनिटे पुरेशी होती. लोकांना नाश्ता करायला जितका वेळ लागतो, तितक्यात तुम्ही शत्रूंना संपवले, असे मी म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. शत्रूच्या हद्दीत तुम्ही टाकलेल्या क्षेपणास्त्रांचा आवाज संपूर्ण जगाने ऐकला. तो आवाज फक्त क्षेपणास्त्राचा नव्हता, तर तुमच्या शौर्याचा आणि भारताच्या शौर्याचा होता, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- India-Pakistan : पाकिस्तानला आली शांतीची आठवण; शाहबाज शरीफांकडून चर्चेचा प्रस्ताव)
पाकिस्तानला दिवसाचा उजेड दाखवला
भारत केवळ परदेशातून निर्यात होणाऱ्या शस्त्रांवर अवलंबून नाही. आपल्या देशात बनवलेली शस्त्रे देखील अचूक आणि अभेद्य आहेत. पाकिस्तानने स्वतः ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ताकद मान्य केली आहे. आपण पाकिस्तानला दिवसा तारे दाखवले आहेत. रात्रीच्या अंधारात ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानला दिवसाचा उजेड दाखवला आहे.
भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि डीआरडीओने विकसित केलेल्या यंत्रणेने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक ठिकाणी, आपले नागरिक पाकिस्तानी ड्रोन येताना पाहून पळून जात नाहीत तर आपल्या सैन्याने ते पाडल्याचे व्हिडिओ बनवत आहेत, अशा शब्दात राजनाथ सिंह यांना हल्लाबोल केला.
(नक्की वाचा- Donald Trump U Turn ट्रम्प पलटले,आता म्हणतात मी शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली नाही)
पाकिस्तानला मदत करणे म्हणजे टेरर फंडिंग
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुढे म्हटलं की, आजच्या काळात पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत ही टेरर फंडिंगपेक्षा कमी नाही. भारताला असे वाटते की, IMF ने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचा निधी देऊ नये. आयएमएफकडून मिळणारा निधी कोणत्याही प्रकारे दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी वापरला जाऊ नये. जर पाकिस्तानकडे अण्वस्त्रे असतील तर ही शस्त्रे कधीतरी दहशतवाद्यांच्या हाती पडू शकतात हे नाकारता येत नाही. ही गंभीर चिंतेची बाब आहे.
VIDEO - राजनाथ सिंह यांचे भाषण
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world