Operation Sindoor Movie Update : दिग्दर्शक रजनीश घई यांचा चित्रपट ‘120 बहादुर'21 नोव्हेंबर 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट 1962 च्या 'रेजांग'ला युद्धावर आधारित आहे, ज्यात 13 कुमाऊं रेजिमेंटच्या 120 शूर सैनिकांनी हजारो चीनी सैनिकांचा सामना केला होता.चित्रपटात फरहान अख्तर मेजर शैतानसिंह भाटी यांची भूमिका साकारत आहे,ज्यांना या युद्धातील शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले होते. चित्रपटातील सैनिकांचा प्रसिद्ध नारा “आम्ही मागे हटणार नाही!” अंगात जोश भरतो, असा आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक रजनीश घई यांनी सांगितले की, चित्रपटाचे चित्रीकरण लडाखमध्ये तब्बल 14,000 फूट उंचीवर झाले आहे.कडक थंडी आणि बर्फाळ वाऱ्यातही संपूर्ण टीमने खरी लोकेशन निवडून शूटिंग केली.जेणेकरून प्रेक्षकांना खऱ्या युद्धाचा अनुभव मिळावा. चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थान आणि मुंबईतही झाले आहे.हा चित्रपट एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओज यांनी संयुक्तपणे तयार केला आहे.
नक्की वाचा >> ऐश्वर्या रायच्या 'या' सिनेमामुळे सलमान खानची सटकली होती! म्हणाला होता, "एक कुत्राही गेला नाही.."
‘ऑपरेशन सिंदूर'ची कमानही सांभाळली अन्..
रजनीश घई यांचे कुटुंबातील सदस्य सैनिक आहेत.त्यांचे भाऊ लेफ्टनंट जनरल राजीव घई सध्या भारतीय सैन्याचे डिप्टी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (स्ट्रॅटेजी) आहेत आणि यापूर्वी डीजीएमओ राहिले आहेत.याच वर्षी झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर'ची कमानही जनरल राजीव घई यांनी सांभाळली होती. जेव्हा रजनीश घई यांना विचारले गेले की ते ‘ऑपरेशन सिंदूर'वरही चित्रपट बनवतील का, तेव्हा त्यांनी हसत उत्तर दिले, “अजून याबद्दल विचार केलेला नाही, पण जर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी सोबत असतील, तर मी नक्की बनवेन.” चित्रपटाचा टीझर आणि गाणी पाहून स्पष्ट दिसते की ‘120 बहादुर' देशभक्ती आणि सैनिकांच्या बलिदानाची एक हृदयस्पर्शी कथा घेऊन येत आहे. हा चित्रपट त्या वीरांना खरी श्रद्धांजली आहे ज्यांनी उणे 40 अंश तापमानातही शत्रूंसमोर कधीही गुडघे टेकले नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world