दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, आज करणार सरेंडर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी दिलासा मिळाला मात्र आज त्यांना सरेंडर करावं लागणार आहे.

Advertisement
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी दिलासा मिळाला मात्र आज त्यांना सरेंडर करावं लागणार आहे. राऊज एव्हेन्यू स्पेशल कोर्टाने दिल्ली मद्य धोरण कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं. यावरील आदेश 5 जूनपर्यंत सुरक्षित ठेवले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दिल्लीचे मुख्यमंत्र्यांच्या अंतरिम जामिनाचा अवधी 1 जूनपर्यंत होता. आता 2 जूनला त्यांना तुरुंग प्रशासनासमोर सरेंडर करावं लागेल. 

वरिष्ठ वकील एन. हरिहरन यांना कोर्टाला लवकर आदेश देण्याची विनंती केली आहे. अन्यथा दाखल केलेल्या याचिकेचा काहीही अर्थ राहणार नाही. मात्र न्यायाधीशांनी याबाबतचा आदेश 5 जून रोजी दिला जाईल, असं सांगितलं. केजरीवाल यांनी ट्रायल कोर्टासमोर दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. एका याचिकेत नियमित जामिनाची मागणी केली आहे. तर दुसऱ्या याचिकेत वैद्यकीय कारणास्तव सात दिवसांच्या अंतरिम जामिनाची मागणी केली आहे. नियनिच जामिनावर 7 जून रोजी सुनावणी होईल. ED ने केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली होती. 

बातमी अपडेट होत आहे.