सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी दिली. ज्यामध्ये त्यांनी मद्यविक्री घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेला आव्हान दिलं आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तत्काळ दिलासा मिळालेला नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्यासाठी प्रत्येक सुनावणी महत्त्वपूर्ण आहे. मद्यविक्री घोटाळा प्रकरणात त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केजरीवाल यांची 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी समाप्त होत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 29 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरुन ईडीला नोटीस जारी केली आहे. यात त्यांनी ईडीकडून त्यांची अटक आणि मद्यविक्री प्रकरणातील त्यांच्या अटकेविरोधात आव्हान दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईडीला 24 एप्रिल किंवा त्यापूर्वी आपलं उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात 29 एप्रिल रोजी या प्रकरणात सुनावणी देईल.
Supreme Court asks ED to file its response on or before April 24. Supreme Court posts the plea of Kejriwal on the week commencing from April 29.
— ANI (@ANI) April 15, 2024
Senior advocate Abhishek Manu Singhvi appearing for Kejriwal tells the Supreme Court that the arrest was made to disable him from… https://t.co/ngPlXoH0zb
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात जाऊन भेट घेतली होती. तुरुंगात अरविंद केजरीवाल यांना कट्टर गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे, असं भगवंत मान यांनी सांगितलं.मात्र काहीही झालं तरी 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर आम आदमी पार्टी मजबूत राजकीय ताकद म्हणून उभी राहिल, असा विश्वास मान यांनी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world