Delhi CM Oath Ceremony : फडणवीस, शिंदे, पवारांसह अनेक दिग्गज स्टेजवर; PM मोदींचं केवळ दोनच नेत्यांशी हस्तांदोलन

PM Modi in Delhi CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यानिमित्त उभारलेल्या मंचावर सर्व बडे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर पोहोचल्यानंतर सर्व बड्या नेत्यांना उभं राहून पंतप्रधान मोदींचं स्वागत केले.

जाहिरात
Read Time: 2 mins
PM Modi in Delhi CM Oath Ceromancy

दिल्लीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडला. मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी आज (20 फेब्रुवारी) शपथ घेतली आहे. तर परवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, राजनाथ सिंह, जेपी नड्डा हे भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याशिवाय NDA शासित राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर बडे नेते देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. याशिवाय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे देखील उपस्थित होते.

पाहा VIDEO

(नक्की वाचा-  Delhi New CM Rekha Gupta : रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, PM मोदींच्या उपस्थितीत शपथविधी)

केवळ दोनच नेत्यांसोबत हस्तांदोलन

शपथविधी सोहळ्यानिमित्त उभारलेल्या मंचावर सर्व बडे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर पोहोचल्यानंतर सर्व बड्या नेत्यांनी उभं राहून मोदींचं स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र यांनी देखील सर्वांना हात जोडून नमस्कार केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांच्याशी हात मिळवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील मोदींनी थांबून संवाद साधला. 

(नक्की वाचा- Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत, दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा)

कुणी-कुणी घेतली शपथ?

  • रेखा गुप्ता- मुख्यमंत्री
  • प्रवेश वर्मा - उपमुख्यमंत्री
  • मनजिंदर सिंह सिरसा 
  • रविन्द्र इंद्राज 
  • कपिल मिश्रा  
  • आशीष सूद 
  • पंकज सिंह