
रामराजे शिंदे, नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी आज (20 फेब्रुवारी) शपथ घेतली आहे. तर परवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएशासित राज्याचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याल उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तीन राज्याचे मुख्यमंत्री अनुपस्थित
अर्थसंकल्पामुळे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेद्र पटेल शपथविधीला उपस्थित राहू शकले नाहीत. तर नितीश कुमार यांची प्रगती यात्रा सुरू असल्यानं ते देखील उपस्थित नव्हते.
(नक्की वाची- Raigad News : जमिनीतून गूढ आवाज आला त्यानंतर हादरे बसले; रायगडमध्ये पहाटे काय घडलं?)
मंत्रिपदाचे शपथ घेणारे चेहरे
- प्रवेश वर्मा - नवी दिल्ली
- मनजिंदर सिंह सिरसा - राजौरी गार्डन
- रविन्द्र इंद्राज - बवाना
- कपिल मिश्रा - करावल नगर
- आशीष सूद - जनकपुरी
- पंकज सिंह - विकासपुरी
रेखा गुप्ता यांची निवड का केली?
दिल्लीच्या महिलांनी निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केले. महाराष्ट्र, हरियाणा, मध्यप्रदेश, दिल्ली विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरली. देशाच्या निवडणुकांमध्येही महिलांची भूमिका महत्त्वाची ठरत असताना एकाही राज्यात भाजपने महिलेला मुख्यमंत्री केले नव्हते. त्यामुळे महिला मुख्यमंत्री केल्याने देशभरातील महिलांना भाजपकडून संदेश देण्याचा प्रयत्न आहे.
(नक्की वाचा- VIDEO : गोल्ड मेडलिस्ट वेटलिफ्टरचा सरावादरम्यान मृत्यू; 270 किलोचा रॉड अंगावर पडला)
RSS चा रेखा गुप्ता यांच्या नावाला पाठिंबा
रेखा गुप्ता या वैश्य समाजाच्या आहेत. भाजपचा कोअर मतदार असणाऱ्या वैश्य समाजाला प्रतिनिधीत्व देऊन भाजपकडून वैश्य समाजाला न्याय दिल्याचा संदेश दिला आहे. रेखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सक्रीय सभासद आहेत. रेखा गुप्ता शालीमार बाग विधानसभेच्या आमदार आहेत. त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला.
(नक्की वाचा- Delhi New CM: कोण आहेत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता? त्यांच्या निवडीत कोणता फॅक्टर निर्णायक?)
रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास
- 1994-95 ला दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी नियुक्ती
- 1995-96 मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या सचिव
- 1996-97 मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या अध्यक्षा
- 2003-2004 ला भाजप दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव
- 2004-2006 ला युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव
- एप्रिल 2007 ला उत्तरी पीतमपुरा वार्डमधून भाजपच्या नगरसेवक झाल्या
- 2007-2009 महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या अध्यक्षा
- मार्च 2010 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती
- सध्या रेखा गुप्ता ह्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा
- रेखा गुप्ता यांचा 2015 आणि 2020 ला विधानसभा निवडणुकीत पराभव
- 2015 ला त्यांचा वंदना कुमारी यांनी 11 हजार मतांनी पराभव केला
- 2020 ला 3 हजार 440 मतांनी पराभव
- यावेळी रेखा गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world