'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...', दिल्लीतील नवं महाविद्यालय; मोदींच्या हस्ते उद्या भूमिपूजन 

नजफगढ इथल्या महाविद्यालयाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नवी दिल्लीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावानं महाविद्यालय स्थापन होणार आहे. विशेष म्हणजे उद्या 3 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजनही होणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जूनला पूर्व आणि पश्चिम दिल्लीमध्ये दिल्ली विद्यापीठाअंतर्गतच दोन कॅम्पसचं भूमिपूजन करणार आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यामध्ये एका कॉलेजचं नाव विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने असणार आहे. दिल्ली विद्यापीठात आधीपासूनच उत्तर आणि दक्षिण असे दोन कॅम्पस आहेत. नव्यानं पूर्व आणि पश्चिम अशा दोन कॅम्पसची निर्मिती केली जाणार आहे. यामधील एका कॉलेजला विनायक दामोदर सावरकर यांचं नाव दिलं जाणार आहे.

नक्की वाचा - Exclusive : पंतप्रधान मोदींचा पुन्हा महाराष्ट्र फोकस, महायुतीच्या सर्व आमदारांना खास निमंत्रण; कारण काय?

या संदर्भात 2021 ला दिल्ली विद्यापीठाने निर्णय घेतला होता. त्यानुसार द्वारका आणि नजफगढ भागात तीन महाविद्यालयांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये एक विधी महाविद्यालय असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  नजफगढ इथल्या महाविद्यालयाला सावरकर यांचं नाव देण्यात येणार आहे. विनायक सावरकर यांच्या नावानं तयार होत असलेल्या नजफगढ इथल्या कॉलेजसाठी 140 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर सुरजमल विहार परिसरात तयार होत असलेल्या शैक्षणिक संकुलासाठी 373 कोटी रुपये तर द्वारका भागातील पश्चिमी परिसरातील शैक्षणिक संकुलासाठी 107 कोटी खर्च अपेक्षित आहे.

Advertisement