जाहिरात

Exclusive : पंतप्रधान मोदींचा पुन्हा महाराष्ट्र फोकस, महायुतीच्या सर्व आमदारांना खास निमंत्रण; कारण काय?

PM Modi Meet : विधानसभेतील महायुतीच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या सर्व आमदारांसह स्नेहभोजन आणि संवाद कार्यक्रम करणार असल्याची माहिती आहे.

Exclusive : पंतप्रधान मोदींचा पुन्हा महाराष्ट्र फोकस, महायुतीच्या सर्व आमदारांना खास निमंत्रण; कारण काय?
नवी दिल्ली:

लोकसभेत जबर फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली. विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, अमित शहा, जेपी नड्डा, नितीन गडकरी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी सभा घेतली. यामध्ये लाडकी बहीण योजना हा टर्निंग पाँइट असल्याचं सांगितलं जातं. महिलांनी लोकसभा निवडणुकीचा कल बदलला आणि लाडक्या बहिणींनी महायुतीला विजयाच्या झेंडा रोवण्यात मदत केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या सर्व आमदारांसह स्नेहभोजन आणि संवाद कार्यक्रम करणार असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप 132, शिंदे गट 57, अजित पवार गट 41 आमदार विजयी झाले. या सर्व आमदारांसह समाजवादी पक्ष आणि महायुतीत असलेल्या अपक्ष आमदारांसह पंतप्रधान मोदी भेट घेणार आहेत. नववर्षाच्या पहिल्या महिन्यात पीएम मोदी समवेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती NDTV मराठीच्या हाती लागली आहे. 

Year Ender 2024 : ना शाहरुख, ना सलमान, ना अमिर, 'या' कलाकारांनी गाजवले 2024

नक्की वाचा - Year Ender 2024 : ना शाहरुख, ना सलमान, ना अमिर, 'या' कलाकारांनी गाजवले 2024

यानिमित्ताने महायुतीच्या सर्व आमदारांशी त्यांच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींसोबत खास संवाद साधला जाणार आहे. पीएम मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह सर्व प्रमुख नेते उपस्थितीत राहणार आहेत. मुंबई किंवा दिल्लीत या खास स्नेहभोजन आणि संवाद कार्यक्रम आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचा फोकस महाराष्ट्राकडे असल्याचं सांगितलं जात आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com