दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर क्राईम प्रकरणातील तपास करायला आलेल्या अंमलबजावणी संचालायनाच्या पथकावर हल्ला करण्यात आला. दिल्लीमधील बिजवासन भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ईडीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ईडीचे पथक PPPYL सायबर एप फ्रॉड प्रकरणातील आरोपी अशोक शर्मा आणि त्याच्या भावाच्या ठिकाणांवर छापा टाकण्यासाठी आले होते. दिल्लीतील बिजवासन भागात छापेमारी करताना पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ईडीचे अतिरिक्त संचालक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा: 'दादा मुख्यमंत्री झाले तर...', छगन भुजबळ मनातलं बोलले; काय केला दावा?
धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी ईडी अधिकाऱ्यांच्या डोक्यात खुर्ची घातली. या प्रकरणातील आरोपी अशोक शर्मा आणि त्याच्या भावाने ईडी टीमवर हल्ला केल्याचा आरोप आहे. एफआयआर नोंदवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसेच ईडी पथकाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्च-तीव्रता युनिट (HIU) ने भारतभर कार्यरत असलेल्या मोठ्या सायबर गुन्हेगारी नेटवर्कशी जोडलेल्या शीर्ष चार्टर्ड अकाउंटंटच्या विरोधात शोध सुरू केला. फिशिंग घोटाळे, क्यूआर कोड फसवणूक आणि अर्धवेळ नोकरी घोटाळ्यांसह हजारो सायबर गुन्ह्यांमधून बेकायदेशीर निधीची लाँड्रिंग उघडकीस आले आहे. त्यानंतर ही छापेमारी केली जात आहे.
महत्वाची बातमी: संसदेच्या अधिवेशनात 'इंडी' आघाडी अडचणीत, TMC कडून काँग्रेसची खरडपट्टी