Pooja Khedkar Update : पूजा खेडकर प्रकरणात मोठा कट उघडकीस येणार, दिल्ली पोलिसांचा दावा

जसजसा तपास पुढे जाईल तसा मोठा कट उघडकीस येईल, असा दावा दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे, प्रतिनिधी 

पूजा खेडकर (Pooja Khedkar Update) यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात दिल्ली उच्च न्यायालयानं पूजा खेडकर यांना आपली बाजू मांडण्यासाठी 7 दिवसांचा अवधी दिला आहे. परंतु दिल्ली उच्च न्यायालयात नेमकं काय झालं, जाणून घेऊया...

पूजा खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी युपीएससीनं (UPSC) दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आपल्याला अटक होऊ नये यासाठी पूजा खेडकरनं पतियाळा हाऊस कोर्टात धाव घेतली. तिथं पूजा खेडकर यांच्या विरोधात निर्णय दिला गेला. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. यापूर्वी ३ वेळा सुनावणी झाली. दरम्यान युपीएससीनं पूजा खेडकर यांना सेवेतून रद्दबातल केले. परंतु आपल्याला विचारणा न करता युपीएससीनं सेवेतून काढून टाकल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी केला. त्यावर युपीएससीनं ईमेल पाठवल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आज सुनावणीत पूजा खेडकर यांच्याकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. पुणे कलेक्टर विरोधात तक्रार केल्यानंतर सर्व चौकशी सुरू झाल्याचा आरोप पूजा खेडकरच्या वकिलांनी केला आहे. तर प्रसार माध्यमांचा दबाव असल्यामुळे पूजा खेडकर यांना त्रास झाल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. 

Advertisement

नक्की वाचा - समृद्धी महामार्ग आणि वरळी सी लिंक टोलमध्ये झोल, राज्य सरकारची मोठी कारवाई

मोठा कट उघडकीस होणार
पूजा खेडकरांची चौकशी करणे का गरजेचे आहे, हे सांगताना दिल्ली पोलीस म्हणाले, या प्रकरणी तपास होणे गरजेचे आहे. जसजसा तपास पुढे जाईल तसा तसा मोठा कट उघडकीस येईल, असा दावा दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी केला आहे. यात महत्त्वाची कागदपत्रं पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. 

Advertisement

अखेर पूजा खेडकरांचा पत्ता कळाला...
मागील काही महिन्यापासून पूजा खेडकर गायब होत्या, परंतु दिल्ली उच्च न्यायालयात पूजा खेडकर यांच्या वकिलांनी त्या पुण्यातच असल्याचा दावा केला आहे. पूजा खेडकर कुठेही पळून गेल्या नाहीत, त्या सर्व तपासाला सहकार्य करणार असल्याचा सांगत, त्या पुण्यातच असल्याचंही स्पष्ट केलं.

Advertisement

IAS पूजा खेडकर सारखे 359 अधिकारी रडारवर?, संपूर्ण यादी NDTV मराठीच्या हाती

4 ऑक्टोबरला सुनावणी
दिल्ली पोलिसांनी दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल तपास केला असता अहिल्यानगर रूग्णालयानं दिव्यांग प्रमाणपत्र दिलेच नसल्याचे समोर आले. त्या संदर्भातचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केले. परंतु आजच्या सुनावणीत पूजा खेडकराच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी १५ दिवसांचा अवधी मागितला. परंतु दिल्ली उच्च न्यायालयानं अंशत: मागणी मान्य करून 7 दिवसांचा अवधी पूजा खेडकर यांना दिला आहे.  पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.