राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात (Gauri Lankesh murder case) आरोप ठेवण्यात आलेले श्रीकांत पांगारकर यांनी जालन्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. 5 सप्टेंबर 2017 मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या बंगळुरू स्थित घरात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.
4 सप्टेंबर रोजी कर्नाटकात उच्च न्यायालयाने दिला जामीन
महाराष्ट्रात एजन्सीच्या मदतीने कर्नाटकात पोलिसांनी केलेल्या तपासात अनेकांना अटक करण्यात आली होती. 2001 आणि 2006 दरम्यान अविभाजित शिवसेनेच्या जालना नगरपालिकेचे नगरसेवक पंगारकर यांना ऑगस्ट 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. यावर्षाच्या 4 सप्टेंबरला कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. 2011 मध्ये शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्याने पंगारकर दक्षिणपंथी हिंदू जनजागृती समितीत सामील झाले होते. त्यांनी शुक्रवारी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर याच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
नक्की वाचा - जरांगेंनी पत्ते खोलले, हिशोब होणार! 'तू देत नाही तर तुला पाडल्या शिवाय सोडत नाही'
इतर आरोपीही जामीनावर...
बंगळुरूच्या सत्र न्यायालयाने गौरी लंकेश हत्याकांडात सामील आठ आरोपींना नुकताच जामीन दिला आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने चार आरोपींना जामीन दिला होता. यानंतर 9 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. 11 ऑक्टोबरला त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world