जाहिरात

E-Bike Catches Fire : इलेक्ट्रिक बाईकला आग; 11 वर्षीय मुलीचा मृत्यू, दोघे जखमी

Electric motorcycle caught fire : रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घराबाहेर उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक बाईकला आग लागून ही घटना घडली. 

E-Bike Catches Fire : इलेक्ट्रिक बाईकला आग; 11 वर्षीय मुलीचा मृत्यू, दोघे जखमी

इलेक्ट्रिक बाईकला लागलेल्या आगीत एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले. मध्य प्रदेशातील रतलाम परिसरात ही घटना घडली आहे. रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घराबाहेर उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक बाईकला आग लागून ही घटना घडली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

औद्योगिक क्षेत्र पोलीस स्टेशनचे प्रभारी व्हीडी जोशी यांनी सांगितले की, भागवत मौर्य नावाच्या व्यक्तीच्या घराबाहेर इलेक्ट्रिक मोटारसायकल चार्ज केली जात होती. तेव्हा तिला आग लागली आणि इतर वाहनेही जळून खाक झाली. कुटुंबाने वाहन चार्जिंग करण्यासाठी लावले आणि झोपी गेले. मात्र काही वेळाने घरात धूर येऊ लागल्याने सर्वांना जाग आली.

(नक्की वाचा- GST Notice to Panipuriwala : तामिळनाडूतील पाणीपुरीवाला GST नोटीसमुळे चर्चेत, कमाई पाहून सगळेच चक्रावले!)

कुटुंबीयांनी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली आणि ते कसे तरी घरातून बाहेर आले. परंतु मौर्य यांची नात अंतरा चौधरी घरातच अडकली.  त्यामुळे गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तर या अपघातात झालेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

(नक्की वाचा- Smartwatch Feature: स्मार्टवॉच सोडवणार सिगारेट ओढण्याचं व्यसन, काय आहे नवी टेक्नोलॉजी?)

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंतरा तिच्या आईसोबत तिच्या आजोबांच्या घरी राहण्यासाठी आली होती आणि रविवारी सकाळी ती वडोदरा (गुजरात) येथील तिच्या घरी परतणार होती. या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: