Ramoji Rao Passed Away: रामोजी समुहाचे चेअरमन रामोजी राव यांनी वयाच्या 88व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. शनिवारी (8 जून) पहाटेच्या 3.45 वाजता त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही नेटवर्कचे ते मालक होते. रामोजी राव हे माध्यम विश्वातील एक मोठे व्यक्तिमत्व मानले जातात. वर्ष 2016मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
(नक्की वाचा: अभिनेता ते नेता... सिनेसृष्टीनंतर राजकीय मैदान गाजवणाऱ्या पवन कल्याणचं महाराष्ट्र कनेक्शन)
मिळालेल्या माहितीनुसार, रामोजी राव यांना उच्च रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना 5 जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेर श्वास घेतला.
नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली
भाजपचे ज्येष्ठ नेते जी. किशन रेड्डी यांनी शोक व्यक्त करत म्हटलेय की, "श्री रामोजी राव गारू यांच्या निधनाने दु:ख झाले. तेलुगू मीडिया आणि पत्रकारितेतील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे."
(नक्की वाचा: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरावर मोठा दरोडा, 10 तोळे सोने लंपास)
सिनेसृष्टीतील मोठे योगदान
रामोजी राव हे भारतीय चित्रपट निर्माते आणि उषाकिरण मुव्हीज प्रोडक्शन कंपनीचे प्रमुख होते. 'चेरुकुरी रामोजी राव' या नावानेही ते प्रसिद्ध होते. जगातील सर्वात मोठे फिल्म प्रोडक्शन रामोजी फिल्म सिटीचे ते मालक होते. सिनेसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.
(नक्की वाचा: बॉलिवूडच्या या सिनेमांची पाकिस्तानात हवा; टॉप 10 मध्ये 7 सिनेमांचा समावेश)