साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार पवन कल्याणच्या जनसेना पक्षाने आंध्र प्रदेशात करिष्माई कामगिरी केली आहे. जनसेना पक्षाने आंध्र प्रदेशात झालेल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 21 जागांवर विजय मिळवला आहे. तर लोकसभा निवडणुकीत 2 खासदार या पक्षाचे निवडून आले आहे. पवन कल्याणने 2014 मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली होती. अभिनेता म्हणून पवन कल्याण याची कारकीर्द यशस्वी राहिलीच आहे. आता राजकीय कारकीर्द देखील तितक्याच वेगाने बहरत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अभिनेता, नेता यासोबत पवन कल्याण यांची पर्सनल लाईफ देखील तितकीच चर्चेत राहिली आहे. 52 वर्षीय पवन कल्याणने आतापर्यंत तीन लग्न केले आहेत. पवन कल्याणने पहिल्या सिनेमाननंतर नंदिनी सोबत लग्न केलं होतं. घरच्यांच्या सांगण्यावरुन पवन कल्याणने हे लग्न केलं होतं. त्यानंतर पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याआधीच आपली को स्टार रेणू देसाईसोबत पवन कल्याण लिव्ह इनमध्ये राहत होता. यानंतर नंदिनीने कायदेशीर कारवाई देखील केली होती. 2007 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पवन कल्याणने नंदिताला 5 कोटी रुपयांचा पोटगी देखील दिली.
(नक्की वाचा- Explainer नितीश कुमार, नायडूंना भाजपाकडून लोकसभा अध्यक्षपद आणि अर्थमंत्रालय का हवंय?)
नंदिनीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रेणू आणि पवन कल्याणने 2009 साली लग्न केलं. त्याआधी 2004 मध्ये दोघांना एक मुलगा देखील होता. मात्र एवढं सगळं झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षात म्हणजे 2012 साली दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर पवन कल्याणने रशियन मॉडेल अन्ना लेजनेवासोबत 2013 मध्ये लग्न केलं.
( नक्की वाचा : BJP स्पष्ट बहुमतापासून दूर, PM मोदींना करावा लागणार 5 मोठ्या आव्हानांचा सामना )
रेणू देसाई कोण आहे?
मराठमोळी रेणू देसाई शंकर महादेवन यांच्या 'ब्रेथलेस' गाण्यात देखील झळकली होती. त्यानंतर तिने तेलुगू सिनेमांमध्ये बद्री आणि जॉनी या सिनेमांमध्ये पवन कल्याणसोबत काम केलं. त्यानंतर महाराष्ट्रात परतून तिने पुन्हा मराठी सिनेमसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. 'मंगलाष्टका वन्स मोर' या मराठी सिनेमाची निर्मिती केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world