जाहिरात

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचा झटका; राष्ट्रवादीच्या घटनेतील बदलांवर मागितला तातडीने खुलासा

Election Commission letter NCP: राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक महत्त्वाचे पत्र पाठवण्यात आले आहे

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचा झटका; राष्ट्रवादीच्या घटनेतील बदलांवर मागितला तातडीने खुलासा
Election Commission letter NCP: निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवार यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
मुंबई:

Election Commission letter NCP: राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक महत्त्वाचे पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. पक्षाच्या घटनेतील काही महत्त्वपूर्ण बदलांसंदर्भात आवश्यक कागदपत्रे आणि ठराव अपूर्ण असल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे. यासंदर्भात तातडीने खुलासा सादर करण्याचे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेतील कलम 6, 7, 12, 18, 32 आणि 36 मध्ये बदल करण्यात आले आहेत. मात्र, या बदलांना पुष्टी देणारे अधिकृत ठराव आणि आवश्यक कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली नाहीत, असे आयोगाने पत्रात स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाच्या पत्रात काय? (Election Commission letter to Sunetra Pawar NCP)

राष्ट्रीय निवडणूक आयोगाने 27 जुलै 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना हे अधिकृत पत्र पाठवले. पत्रात स्पष्ट केल्यानुसार, पक्षाने घटनेतील अनेक महत्त्वाच्या बदलांना समर्थन देणारी वैध कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर केलेले नाहीत.

आयोगाच्या माहितीनुसार, पक्षाच्या 26 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनातील ठरावात केवळ कलम 18(1) मधील दुरुस्तीचा स्पष्ट उल्लेख आढळतो. मात्र, प्रत्यक्ष व्यवहारात पक्षाने कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्येही मोठे बदल केले आहेत. या इतर कलमांमधील बदलांना मान्यता देणारे अधिकृत प्रस्ताव आणि कागदपत्रे आयोगाला अद्याप प्राप्त झालेली नाहीत.

( नक्की वाचा : Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीतून 94 हजार नावे वगळली; तुमचं नाव यादीत आहे का? 'या' पद्धतीनं करा चेक )
 

पुढील निर्णयाकडे लक्ष

निवडणूक आयोगाने या सर्व घटनात्मक दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून वैध कागदपत्रे आणि अधिकृत ठराव लवकरात लवकर सादर करण्याची मागणी केली आहे. पक्षाकडून ही सर्व प्रलंबित कागदपत्रे आणि स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतरच आयोग या बदलांवर अंतिम निर्णय घेणार आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com