जाहिरात

NCP News: दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरणाचं ठरलं? मात्र 'या' एका मुद्द्यावर पेच कायम?

NCP Merger News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला असला, तरी "संयुक्त राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे राहणार?" या मुद्द्यावर विलीनीकरणाचा पेच कायम आहे.

NCP News: दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरणाचं ठरलं? मात्र 'या' एका मुद्द्यावर पेच कायम?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून आहे. पडद्यामागे देखील अनेक घडामोड घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेला वेग आला असला, तरी 'एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व नक्की कोणत्या गटाने आणि कुणी करायचे?' या मुख्य मुद्द्यावर विलीनीकरण रखडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे या विलीकरणाच्या चर्चांना आणि NDA प्रवेशाच्या शक्यतांना अधिक बळ मिळाले आहे.

नेतृत्वावरून विलीनीकरणाचा पेच 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांच्या एकत्रीकरणानंतर पक्षाची कमान अजित पवार गटाकडे असणार की शरद पवार गटाकडे, यावर अद्याप एकमत झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NDA मध्ये स्वतंत्रपणे कोणत्याही नव्या पक्षाला प्रवेश देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एनडीएमध्ये सहभागी व्हायचे असेल तर दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येऊन 'विलीनीकरण' करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा स्पष्ट संदेश भाजपने दिला आहे.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?)

गुप्त बैठकांचा सिलसिला 

विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी जाऊन स्वतंत्रपणे भेट घेतली होती. अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेतृत्वाचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागणार आहे, मात्र अद्याप याबाबत अंतिम तोडगा निघालेला नाही.

(नक्की वाचा-  VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)

पवार-मोदी भेट आणि 'NDA' प्रवेशाच्या चर्चा

लोकसभा मतदारसंघ फेररचनेच्या घटनादुरुस्ती विधेयकाला अटी-शर्तींवर पाठिंबा देण्याची भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली होती. या विधेयकाच्या निमित्ताने शरद पवार गट NDAमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. याच काळात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. "NDA तील सहभागाबाबत शरद पवारांची भूमिका अजून तरी संदिग्ध आहे, मात्र या भेटीनंतर लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो," असे मत दिल्लीतील राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com