एक निवडणूक अशी ज्यात अपक्ष खासदारांचा रेकॉर्ड, आता मात्र संख्या रोडावली!

गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ चार अपक्ष उमेदवार यशस्वी होऊन  लोकसभेत पोहोचले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी सुरू झाली आहे. यंदा मुख्य लढत एनडीए आणि विरोधी पक्षाच्या INDIA आघाडीमध्ये असल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीच्या चर्चेदरम्यान अपक्ष खासदारांचं काय झालं हे जाणून घेणंही आवश्यक आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर लोकसभेत पोहोचणाऱ्या अपक्ष खासदारांची संख्या कमी होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत वेळेबरोबरच अपक्ष उमेदवारांचं आकर्षक कमी झालं आहे हे नाकारता येत नाही. याच कारणास्तव गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ चार अपक्ष उमेदवार यशस्वी होऊन  लोकसभेत पोहोचले.

एकेकाळी लोकसभेत अपक्ष खासदारांच्या संख्येने रेकॉर्ड केला होता. 17 व्या लोकसभेत भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांची संख्या सोडली, तर जिंकून लोकसभेत पोहोचलेल्या अपक्षांइतके सदस्य कोणत्याही पक्षाकडे नव्हते. 

Advertisement

प्रत्येक लोकसभा निवडणुकीनंतर अपक्ष खासदारांची संख्या कमी झाली आहे. देशात आतापर्यंत सर्वाधिक अपक्ष खासदार 1957 मध्ये यशस्वी होऊन लोकसभेत पोहोचले होते. त्यावेळी यशस्वी झालेल्या अपक्ष खासदारांची संख्या 42 होती. यापूर्वी 1952 मध्ये झालेल्या देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष खासदारांची संख्या 37 होती. 1962 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष खासदारांची संख्या 20 होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत अपक्ष खासदारांची संख्या निम्म्याहून अधिक घसरली. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकीत अपक्ष खासदारांची संख्या पुन्हा एकदा वाढली.

Advertisement


निवडणूक               अपक्ष खासदारांची संख्या

1952                           37

1957                           42

1962                          20

1967                          35

1971                          14

1989                          12

1991                          01

2019                          04

Advertisement

1967 च्या लोकसभा निवडणुकीत 35 अपक्ष उमेदवार विजयी होऊन लोकसभेत पोहोचले. या निवडणुकीत पुन्हा एकदा अपक्ष खासदारांची संख्या वाढली. मात्र, ही शेवटची निवडणूक होती ज्यात अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होऊन लोकसभेत पोहोचले. त्यानंतरच्या काही वर्षांत ही संख्या कमी होत गेली. 1971 मध्ये 14 अपक्ष उमेदवार आणि 1989 मध्ये 12 अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. याशिवाय आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत अपक्ष खासदारांची संख्या कधीही वाढली नाही. 1991 च्या निवडणुकीत 5 हजार 514 अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आणि एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. ही सर्वात कमी संख्या आहे.