जाहिरात

Chemical Factory Blast: मोठी दुर्घटना! केमिकल कारखान्यात भीषण स्फोट, 10 कामगारांचा मृत्यू

Telangana Chemical Factory Blast: अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि आग विझवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Chemical Factory Blast:  मोठी दुर्घटना! केमिकल कारखान्यात भीषण स्फोट, 10 कामगारांचा मृत्यू

Telangana Chemical Factory Blast:  तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पाशा मेलाराम औद्योगिक क्षेत्रात सोमवारी सकाळी एक भयानक दुर्घटना घडली. पाशा मेलाराम येथे सीगाछी केमिकल्स कारखान्यात झालेल्या मोठ्या स्फोटानंतर भीषण आग लागली. कारखान्याच्या रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला आणि काही क्षणातच आगीने संपूर्ण कारखान्याला वेढले. या दुर्घटनेत 10 कामगारांचा मृत्यू झाला, तर 20 कामगार जखमी झाले, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Punjab News: आधी खणखणीत सिक्स, पुढच्याच क्षणी मृत्यू.. तरुणाचा मैदानावर जीव गेला, पाहा VIDEO

हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आला आणि परिसरात खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोटामुळे अनेक कामगार 100 मीटर अंतरावर उडून पडले. आज सकाळी 9  वाजता ही दुर्घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि आग विझवण्याचे काम वेगाने सुरू आहे. 108 रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. 

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 10 कामगार जिवंत जाळले गेले आहेत.  जखमींना प्राथमिक उपचारांसाठी तांचेरू येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे, तर गंभीर जखमींना हैदराबादला रेफर करण्यात आले आहे. या अपघातानंतर कारखान्याची इमारत कोसळली. ढिगाऱ्यात कामगार अडकल्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करत कारखाना आणि आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली आहे. कारखान्यात 100 हून अधिक कामगार काम करतात. 

Video: मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील 19 वाहनं रस्त्यांवर एकदम बंद! कारण समजल्यावर बसेल धक्का

स्थानिक लोकांनी सांगितले की ही कंपनी औषधे तयार करण्यासाठी वापरली जाणारी पावडर तयार करते. विविध राज्यांतील 100 हून अधिक कामगार येथे काम करतात. अपघाताची बातमी मिळताच कामगारांचे कुटुंबीय कारखान्याबाहेर जमले. प्रशासनाने लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे आणि अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com