जाहिरात

Weather Forecast: मान्सूनवर 'अल निनो'चे सावट! तापमानात 5-7 अंशांनी वाढ होण्याचा 'IMD'चा इशारा

El Nino Probability Increases: जागतिक हवामान संघटनेनुसार, मे-जुलै दरम्यान 'अल निनो' सक्रिय होण्याची शक्यता 40% आहे. यामुळे भारतीय मान्सूनवर परिणाम होऊन तापमानात सरासरीपेक्षा 5 ते 7 अंशांनी वाढ होऊ शकते.

Weather Forecast: मान्सूनवर 'अल निनो'चे सावट! तापमानात 5-7 अंशांनी वाढ होण्याचा 'IMD'चा इशारा

El Nino Probability Increases: जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या (WMO) ताज्या अहवालाने भारतीय शेतकऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या चिंतेत भर घातली आहे. या वर्षी 'अल निनो'ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता 40 टक्के असून, त्याचा थेट फटका भारताच्या पावसाळ्याला बसू शकतो. सध्या देशाच्या अनेक भागांत उष्णतेच्या लाटेने नागरिक होरपळून निघत असतानाच हा नवा इशारा समोर आला आहे.

काय आहे 'अल निनो' आणि त्याचा परिणाम?

'अल निनो' म्हणजे मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा वाढणे. साधारणपणे अल निनोच्या काळात भारतीय उपखंडात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी होतो. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

(नक्की वाचा- पालघर समुद्रकिनारी खळबळ! अचानक हेलिकॉप्टर उतरल्याने नागरिकांची पळापळ, चौकशीनंतर सत्य आलं समोर)

ला निना विरुद्ध अल निनो 

'ला निना'मुळे भारतात चांगला पाऊस होतो, मात्र 'अल निनो' नेमका त्याच्या उलट परिणाम करतो. 

तापमानात मोठी वाढ होणार?

भारतीय हवामान विभागाने मंगळवारी पुढील तीन ते पाच दिवसांसाठी महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात तापमान सामान्यपेक्षा 5-7 अंश सेल्सिअस जास्त राहण्याची शक्यता आहे. दिल्ली-NCR, गुजरात आणि मध्य प्रदेशात तापमान 4-6 अंश सेल्सिअसने वाढू शकते. दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील पाच दिवस तापमान 2-3 अंश सेल्सिअसने अधिक असेल. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com