राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी रविवारी देशातील एकूण प्रजनन दर म्हणजेच टोटल फर्टिलटी रेट (TFR) बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी देशवासियांना 3 मुलांना जन्म देण्याचं आवाहन केलं आहे. देशाचा प्रजननं दर 2.1 ऐवजी किमान 3 हवा असं मत सरसंघचालकांनी व्यक्त केलंय. लोकसंख्येच्या धोरणांमध्येही लोकसंख्य़ा वाढीचा दर 2.1 टक्क्यांपेक्षा कमी होऊ नये, असं सांगितल्याचं भागवत यांनी स्पष्ट केलं.
ज्या समाजाचा प्रजनन दर 2.1 टक्क्यांपेक्षा कमी होतो ती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचते, असं भागवत यांनी सांगितलं. त्यानंतर प्रजनन दराबाबत नव्यानं वाद सुरु झाला आहे. या विषयावर राजकारण तापलंय. त्यानंतर भारताचं भविष्य धोक्यात आहे का? हा प्रश्न निर्माण झालाय. प्रसिद्ध मेडिकल जर्नल लँसेटनं याबाबतचा अहवाल या वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलाय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नं देखील आदर्श प्रजनन दर 2.1 असल्याचं सांगितलंय. या रिपोर्टमध्ये काय आहे हे समजून घेऊया
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टोटल फर्टिलटी रेट (TFR) म्हणजे काय?
टोटल फर्टिलटी रेट म्हणजेच टीएफआर एक महत्त्वाचे लोकसंख्येचे निर्देशक (Demographic Indicators) आहे. कोणतेही क्षेत्र किंवा देशात महिलांकडून सरासरी मुलं जन्माला घालणारी संख्या यामध्ये दाखवण्यात येते. सोप्या शब्दात सांगायचं तर एखादी महिला तिच्या संपूर्ण प्रजनन काळात (साधरणपणे 15 ते 49 वर्ष) सरासरी किती मुलांना जन्म देते हे टीएफआरमधून स्पष्ट होतं.
- जास्त टीएफआर असेल तर लोकसंख्या वाढीचा वेग जास्त
- टीएफआर कमी असेल तर संथ आणि स्थिर लोकसंख्या
- टीएफआरचा थेट संबंध सामाजिक आणि आर्थिक विकासाशी असतो.
- टीएफआरचा विचार करुन सरकार लोकसंख्या नियोजन आणि विकासंबंधीचं धोरण बनवते.
- उच्चशिक्षित आणि आर्थिक दृष्टीनं सशक्त महिलांचं टीएफआर सामान्यपणे कमी असतो.
- शहरी भागातील टीएफआर ग्रामीण क्षेत्रापेक्षा कमी असतो.
भारताबाबत टीएफआर अहवाल काय?
मोहन भागवत यांनी काय सांगितलं?
डॉ. मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्यावर चिंता व्यक्त केलीय. त्यांनी रविवारी एका कार्यक्रमात सांगितलं की, 'भारताचा एकूण प्रजनन दर (टीएफआर) सध्याच्या 2.1 ऐवजी किमान तीन हवा. लोकसंख्येच्या शास्त्रानुसारी कोणत्याही समाजाचा एकूण प्रजनन दर 2.1 पेक्षा कमी झाला तर तो समाज नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचतो,' असा त्यांनी इशारा दिला.
( नक्की वाचा : 'अधिक मुलं जन्माला घाला', 'या' राज्यातील मुख्यमंत्र्यांचं आवाहन, सवलती देण्याचंही आश्वासन )
अनेक भाषा आणि संस्कृती यापूर्वी लुप्त झाल्या आहेत. त्यासाठीच प्रजनन दर 2.1 पेक्षा जास्त कायम ठेवणे आवश्यक आहे, असं भागवत यांनी स्पष्ट केलं.
मोहन भागवत यांनी सांगितलं की, 'कुटुंब (परिवार) समाजाचा अविभाज्य अंग आहे. प्रत्येक परिवाराला समाजाच्या जडणघडणीत महत्त्व आहे. आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण जे 1998 किंवा 2002 च्या आसपास तयार केलं आहे, त्यानुसार लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी असून नये. तो कमीत कमी तीन हवा. लोकसंख्या शास्त्र हेच सांगतं.'
प्रजनन दरातील (TFR) घसरणीचा काय होतो परिणाम?
प्रजनन दरामध्ये सातत्यानं होत असलेल्या घसरणीचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होताात. कमी लोकसंख्या वाढीमुळे प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होते. कमी साधनसंपत्ती कमी लोकांमध्ये वाटणे सोपे असते. कमी मुलं असतील तर कुटुंबांना शिक्षण आणि आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रीत करता येतं. कमी लोकसंख्या असेल तर कमी साधनांचा वापर होतो. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हासही कमी होतो.
( नक्की वाचा : देशात हिंदूच्या लोकसंख्येत घट, मुसलमानांची लोकसंख्या 43 टक्के वाढली )
अर्थात याचे अनेक नकारात्मक परिणाम देखील आहेत. भागवत यांनी त्याकडं इशारा केलाय. कमी जन्म दर असेल तर वृद्धांची संख्या वाढेल. त्यामुळे सामाजिक सुरक्षा प्रणालीवर दबाव वाढू शकतो. कमी जन्म दर असेल तर भविष्यात कामगारांची संख्या कमी होऊ शकते. दीर्घकाळासाठी कामगारांची संख्या कमी असेल तर आर्थिक वाढीवरही परिणाम होऊ शकतो. पारंपारिक कौटुंबीक रचना तसंच सामाजिक मुल्यांमध्येही बदल होऊ शकतात. एखाद्या विशिष्ट समुदाय नष्ट होण्याचाही धोका असू शकतो.
जगभरात काय आहे परिस्थिती?
इराण, ब्रिटन, चीन या देशात प्रजनन दरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जपानमध्ये सर्वात कमी प्रजनन दर आहे. तैवान, इटली, स्पेन, सिंगापूरमध्येही हा दर मोठ्या प्रमणात घसरलाय. जागतिक आरोग्य संघटनेकडून तो वाढीसाठी प्रयत्न केले जात होते.
इराणमधील प्रजनन दर फक्त दहा वर्षात प्रती महिला 6 पेक्षा जास्त मुलांवरुन 3 पेक्षा कमी मुलांपर्यंत घसरला आहे. भारतामध्येही 2000 नंतर जनम्म दरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या घसरणीचा परिणाम 2-3 दशकांनंतर उत्पादनांवर होईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
The Lancet च्या रिपोर्टमधील टीएफआरबाबत केलेल्या दाव्यानुसार गेल्या सात दशकांमध्ये प्रजनन दर निम्मा झाला आहे. 1950 च्या दशकात जागतिक स्तरावरी एकूण प्रजनन दर 4.8 पेक्षा जास्त होता. तो 2021 साली कमी होऊन 2.2 झालाय. हा आकडा 2050 पर्यंत 1.8 तर 2100 पर्यंत 1.6 होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
शेजारच्या देशांमधील परिस्थिती काय?
पाकिस्तानचा प्रजनन दर भारतापेक्षा थोडा जास्त आहे. पण, गेल्या काही दशकांमध्ये त्यामध्येही मोठी कमतरता झालीय. बांगलादेशमध्ये कुटुंब नियोजनाच्या यशस्वी कार्यक्रमामुळे प्रजनन दर मोठ्या प्रमाणात कमी झालाय. चीनमध्ये एक मुल धोरणानुसार प्रजनन दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता हे धोरण बदलून दोन मुलं करण्यात आलं आहे. नेपाळमध्येही प्रजनन दर कमी आहे. पण, तो भारतापेक्षा थोडा जास्त आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world