
Mohan Bhagwat on Operation Sindoor : पाकिस्तानसोबत काही दिवसांपूर्वी झालेल्या लष्करी संघर्षावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'जग तुमचे म्हणणे तेव्हाच ऐकते जेव्हा तुमच्याकडे शक्ती असते,' असं भागवत यांनी म्हंटलं आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भागवत पुढे म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात प्राचीन देश आहे. त्याची भूमिका मोठ्या भावासारखी आहे. भारत जगात शांती आणि सलोखा निर्माण करण्यासाठी कार्य करत आहे.
आरएसएसचे सरसंघचालक शनिवारी जयपूरमधील हरमाडा येथे रविनाथ आश्रमात आयोजित रविनाथ महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, भारतात त्यागाची परंपरा आहे. भगवान श्रीरामांपासून ते भामाशाहपर्यंत सर्वांना आपण पूजतो आणि मानतो. भागवत म्हणाले की, जगाला धर्म शिकवणे हे भारताचे कर्तव्य आहे, पण त्यासाठी शक्तीचीही आवश्यकता आहे.
( नक्की वाचा : PM मोदींनी थरुर आणि ओवैसींची निवड का केली? पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा काय आहे प्लॅन? )
पाकिस्तानवर काय म्हणाले भागवत?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षावर बोलताना भागवत म्हणाले, 'भारत कुणाचाही द्वेष करत नाही, परंतु जग प्रेम आणि कल्याणाची भाषा तेव्हाच ऐकते जेव्हा तुमच्याकडे शक्ती असते. हा जगाचा स्वभाव आहे. हा स्वभाव बदलता येणार नाही, म्हणून जगाच्या कल्याणासाठी आपल्याला शक्तिसंपन्न असणे आवश्यक आहे. आपली ताकद जगाने पाहिली आहे.
#WATCH | Jaipur, Rajasthan | RSS chief Mohan Bhagwat says, "...India will progress in every field; it should. India doesn't have enmity with anyone, but if someone dares, India has the strength to teach them a lesson; it should have this strength. India does things which are… pic.twitter.com/esLvQrpi1u
— ANI (@ANI) May 17, 2025
विश्व कल्याण हा आपला धर्म आहे. विशेषतः हिंदू धर्माचे तर हे निश्चित कर्तव्य आहे. ही आपली ऋषी परंपरा आहे, ज्याचे पालन संत समाज करत आहे, असंही भागवत यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world