जाहिरात

"कोणी विद्यार्थ्यांच्या जीवनाचा खेळ केला, तर..", पेपर लीक प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

"जे कोणी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळतील किंवा परीक्षा पेपर लीक करण्याचं पाप करतील,तर त्यांना दहा वर्षांची शिक्षा,दहा कोटी रुपये दंड,फास्ट ट्रॅकवर प्रकरण चालवणे,अशा सर्व गोष्टी केल्या जाणार आहेत"

"कोणी विद्यार्थ्यांच्या जीवनाचा खेळ केला, तर..", पेपर लीक प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
Eknath Shinde Press Conference Today

Eknath Shinde Press Conference : "जंतरमंतरवर जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा नैतिक जबाबदारी म्हणून दिलेला आहे. ज्यांचं आंदोलन होतं,ते आपापल्या कामात व्यस्त झाले आहेत.जंतरमंतरवर आंदोलन सुरु असताना त्यांच्यामागून राजकारण केलं गेलं.त्यांचं आंदोलन संपलं आहे.पण ह्यांचं आंदोलन संपत नाहीय.धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला तो दिला.मोदिंनीही कठोर पावले उचलली.कायद्यात बदल केला.जे कोणी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळतील किंवा परीक्षा पेपर लीक करण्याचं पाप करतील,तर त्यांना दहा वर्षांची शिक्षा,दहा कोटी रुपये दंड,फास्ट ट्रॅकवर प्रकरण चालवणे,अशा सर्व गोष्टी केल्या जाणार आहेत. यासाठी तज्ज्ञ लोकांचा टास्क फोर्सही नेमला आहे",असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केलं.

"पंतप्रधान मोदींनीही त्यांचा सन्मान ठेऊन निर्णय घेतले"

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "मोदीजी स्वत: या तरुणांसोबत फेस टू फेस बोलत आहेत.त्यांच्यासोबत संवाद साधत आहेत.विद्यार्थी आणि तरुण वर्ग देशाचं भवितव्य आहे.सरकारने आणि पंतप्रधान मोदींनीही त्यांचा सन्मान ठेऊन निर्णय घेतले.ते स्वत: त्यांच्याशी बोलतही आहेत.मग अमितभाईंचा राजीनामा मागणे केवळ राजकारण आहे.अमितभाईंनी नक्षलवाद संपवला.अमितभाईंनी मोदींजींच्या मार्गदर्शनाखाली 370 कलम हटवलं. म्हणून राजीनामा मागत आहेत का?,असाही सवाल शिंदेंनी उपस्थित केला.

नक्की वाचा >> Isabgol Tips: रोज 1 चमचा इसबगोल खाल्ल्यास काय होईल? वाचा डॉ राम यांनी कॅलरीज, फॅट्स फायद्यांची दिलेली माहिती

"कोणालाही सोडलं जाणार नाही"

"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणं,हे एक मोठं षडयंत्र होतं.फक्त राजकीय स्टंट न करता सकारात्मक चर्चा केली पाहिजे.ज्या लोकांनी लाठीचार्ज केला,ज्या लोकांनी आंदोलनात कारवाई केली त्याची चौकशी होतंच आहे.पंतप्रधानांनी सांगितलं आहे त्यांची चौकशी होणार आहे.कोणालाही सोडलं जाणार नाही",असंही शिंदे म्हणाले.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com