T20 विश्वचषक 2024 स्पर्धेत भारतीय संघाने शानदार विजय मिळवत विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा भारतीय फलंदाज विराट कोहली हा आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये वेळ घालवत आहे. कोहली आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असताना इकडे भारतामध्ये त्याच्या हॉटेलविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. विराटच्या बंगळुरूमधील रेस्टॉरंटविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बंगळुरूच्या एमजी रोडवर असलेल्या कोहलीच्या 'one8 commune' नावाच्या रेस्टॉरंटविरोधात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
बंगळुरू शहर पोलिसांनी एमजी रोडवर असलेल्या 'one8 commune' रेस्टॉरंटवर कालमर्यादेपेक्षा जास्त वेळ हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. हे रेस्टॉरंट रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असताना ते रात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू होतं असा आरोप आहे.
Karnataka | FIR registered against Virat Kohli owned One8 Commune in Bengaluru's MG road.
— ANI (@ANI) July 9, 2024
We have booked around 3-4 pubs for running late till 1:30 am last night. We received complaints of loud music being played. Pubs were allowed to remain open only till 1 am and not beyond…
विराट कोहलीची रेस्टॉरंट चेन One8 Commune ची रेस्टॉरंट दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोलकाता यासह भारतातील अनेक प्रमुख शहरांमध् आहे. One8 Commune चे बंगळुरूतील रेस्टॉरंट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झाले होते.परदेशातही विराटच्या रेस्टॉरंटच्या शाखा आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world