Flight Ticket : विमानाचं तिकीट रद्द करण्यासाठी नो चार्ज? DGCA चे नव्या नियमांमुळे प्रवाशांमध्ये आनंदीआनंद

Flight Ticket Cancellation Charges 2025: सध्या तिकीट रद्द करण्याच्या नियमांबद्दल प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत किंवा शुल्क इतके जास्त आकारले जाते की तिकीट रद्द करण्यामुळे मोठं नुकसान होतं.

जाहिरात
Read Time: 3 mins
Air Ticket Cancellation Refund Rule:
नवी दिल्ली:

जर तुम्ही नियमितपणे विमानाने प्रवास करत असाल किंवा अनेकदा तुमच्यावर तिकीट रद्द करण्याची वेळ येत असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. आता विमानाचं तिकीट रद्द करण्यासाठी मोठी रक्कम द्यावी लागणार नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) एक नवा नियम आणणार आहे. याअंतर्गत प्रवासी तिकीट बुकिंगच्या ४८ तासांच्या आत कोणत्याशी शुल्काशिवाय आपलं तिकीट रद्द किंवा बदलू शकता. 

४८ तासात फ्रीमध्ये रद्द किंवा बदल करा...

DGCA ने सांगितलं की, नवीन नियम लागू झाल्यानंतर प्रवासांना तिकीट बुकिंग केल्याच्या ४८ तासांपर्यंत लुक-इन पीरियड मिळेल. यादरम्यान तिकीट रद्द करण्यासाठी किंवा प्रवासाची तारीख बदलण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाही. मात्र नव्या तिकिटाचे रेट जास्त असतील तर केवळ त्याचे पैसे द्यावे लागतील. 

बुकिंगच्या ५ दिवसांच्या आत (देशांतर्गत उड्डाणे) किंवा १५ दिवसांच्या (आंतरराष्ट्रीय उड्डाणे) आत प्रवास तारखा असलेल्या फ्लाइट्सवर ही सुविधा उपलब्ध नसेल. इतक्या लवकर बुक केलेल्या विमानांसाठी हा नियम लागू होणार नाही.

एजंट किंवा पोर्टलवरुन तिकीट खरेदी, तरीही एअरलाइन्सकडून रिफंड...

अनेकदा लोक MakeMyTrip, Yatra किंवा ट्रॅव्हल एजंटकडून तिकीट बुक करतात. यावेळी तिकीट रद्द केल्यानंतर रिफंडला बराच वेळ लागतो. DGCA च्या नव्या प्रस्तावात हा त्रास दूर होईल. जर तुम्ही विमानाचं तिकीट कुणी एजंट किंवा पोर्टलवरुन खरेदी करीत असाल तेव्हाही रिफंडची जबाबदारी थेट एअरलाइन्सची असेल. 

Advertisement

DGCA ने स्पष्ट सांगितलं, एजंट किंवा ट्रॅव्हल पोर्टल एअरलाइन्सचे अधिकृत प्रतिनिधी असतात. त्यामुळे जर तिकीट रद्द झालं तर पैसे परत करण्याची जबाबदारी एअरलाइन्स कंपनीची असेल, एजंटची नाही. 

Advertisement

नक्की वाचा - Pune Railway News: पुणे रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! तुमची तक्रार 20 मिनिटात सोडवणार, स्टेशनवर 'ही' खास सोय

२१ दिवसात रिफंड पूर्ण करण्याचा नियम

DGCA ने एअरलाइन्स दिलेल्या निर्देशानुसार, तिकीट रद्द झाल्यानंतर रिफंडची प्रक्रिया २१ वर्किंग डेच्या आत पूर्ण करावी लागेल. त्यामुळे आता महिनोमहिने वाट पाहण्याची गरज नाही. 

मेडिकल Emergency मध्येही रिफंड किंवा क्रेडिट शेलचा पर्याय

नव्या नियमांतर्गत जर कोणत्याही प्रवाशाला मेडिकल Emergency मुळे प्रवास रद्द करावा लागत असेल तर एअरलाइन्स त्याला संपूर्ण रक्कम परत करेल किंवा क्रेडिट शेलचा (Credit Shell) पर्याय देऊ शकते. ज्याचा नंतर उपयोग केला जाऊ शकेल.  

Advertisement

तिकीटाच्या नावातील चूक सुधारण्यासाठी नो चार्ज

जर एखाद्या प्रवाशाने तिकीट बुक करताना नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक केली आणि २४ तासाच्या आत एअरलाइन्सला याबाबत सांगितलं तर त्याला अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाही. मात्र एअरलाइन्सच्या वेबसाइटवरुन हे तिकीट बुक केले असेल तरच ही सुविधा मिळेल.  

नवे नियम केव्हापासून होणार लागू? 

DGCA ने हे सर्व बदल ड्राफ्ट CAR (Civil Aviation Requirement) जारी केले आहेत आणि ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व स्टेकहोल्जर्सच्या सूचना मागितल्या आहेत. म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत सूचना येणं  अपेक्षित आहे. नवे नियम लागू झाले तर हवाई प्रवाशांसाठी हे मोठं गिफ्ट असेल. 

नवे बदल का आवश्यक?

सध्या तिकीट रद्द करण्याच्या नियमांबद्दल प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत किंवा शुल्क इतके जास्त आकारले जाते की तिकीट रद्द करण्यामुळे मोठं नुकसान होतं. डीजीसीएच्या या नवीन प्रस्तावामुळे ही समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होईल आणि प्रवाशांना परवडणारा, पारदर्शक आणि तणावमुक्त प्रवास करता येईल.

जर हा बदल लागू झाला तर, विमान प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सोपा आणि ग्राहक-अनुकूल होईल. तिकीट रद्द करणे किंवा नाव बदलणे यासारख्या किरकोळ चुकांवर आता मोठे शुल्क आकारले जाणार नाही. प्रवासी बऱ्याच काळापासून या सवलतीची वाट पाहत आहेत.