जाहिरात

Pune Railway News: पुणे रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! तुमची तक्रार 20 मिनिटात सोडवणार, स्टेशनवर 'ही' खास सोय

Pune Railway News: पुणे रेल्वे स्थानकावर होणारी प्रचंड गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात ङेता वॉर रुम स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Pune Railway News: पुणे रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! तुमची तक्रार 20 मिनिटात सोडवणार, स्टेशनवर 'ही' खास सोय
  • पुणे रेल्वे स्थानकावर दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात आणि त्याठिकाणी सर्वाधिक गर्दी होते
  • गर्दी आणि प्रवाशांच्या गैरसोयीवर मात करण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने डिजिटल वॉर रूम स्थापन केली आहे
  • वॉर रूममध्ये २४ तास दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून तक्रारींना 20 मिनिटांत निराकरण करण्याचा उद्देश आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Pune Railway Station War Room News: देशामधील सर्वाधिक गर्दी होणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये पुणे स्टेशनचा समावेश आहे. पुणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी ये-जा करत असतात. या प्रवाशांच्या सोईसाठी पुणे रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे रेल्वे स्थानकावर होणारी प्रचंड गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात ङेता वॉर रुम स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कशी असेल डिजिटल वॉररुम?

डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या या वॉर रूममध्ये २४ तास दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना त्वरित प्रतिसाद देणे हा आहे. कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, तक्रार प्राप्त होताच संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, अवघ्या २० मिनिटांमध्ये त्या तक्रारीचा निपटारा करण्यात यावा, असा या वॉर रुमचा उद्देश आहे.

Pune Accident CCTV Footage: पुण्यात भीषण अपघात.. दोन भावांचा मृत्यू, कारचे तुकडे, हादरवणारा VIDEO

तसेच या 'वॉर रूम'मुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणेही सोपे झाले आहे. ज्या ठिकाणी अधिक गर्दी आहे, तिथे अतिरिक्त मनुष्यबळ आणि सुरक्षा बलाचे जवान तैनात करून गर्दीचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वे पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव यांनी दिली आहे. 

प्रवाशांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण

प्रवाशांकडून मुख्यतः गाडीतील पंखे बंद असणे, अस्वच्छता, बेडरोल खराब असणे, स्वच्छतागृहात पाणी नसणे, विद्युत उपकरणातील बिघाड, मोबाईल चार्जरची समस्या, गाडी विलंब आणि सहप्रवाशांचे गैरवर्तन यांसारख्या तक्रारी येतात. या तक्रारी 'रेल मदत' (Rail Madad) ॲप किंवा रेल्वेच्या 'एक्स' (X) हँडलवर मोठ्या प्रमाणात केल्या जातात. तक्रारदारास थेट वॉर रूममध्ये किंवा फलाटावरील कर्मचाऱ्यांकडे तक्रार नोंदवता येते. प्रशासनाचा हा प्रयत्न निश्चितच प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देईल.

जेलमधून फिल्डिंग? धो- धो पावसात रक्त सांडलं, गणेश काळे मर्डरचे आंदेकर कनेक्शन!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com