जाहिरात

Aadhaar Card हरवलंय, नंबरही आठवत नाही? या सोप्या ट्रीकने होईल टेन्शन दूर

How To Find Aadhaar Number: जर तुमचे आधार कार्ड गहाळ झाले असेल आणि त्याची तातडीची गरज असेल तर तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरूनही आधार नंबर शोधू शकता.

Aadhaar Card हरवलंय, नंबरही आठवत नाही? या सोप्या ट्रीकने होईल टेन्शन दूर
Aadhaar Card Online Download: आधार कार्ड गुम होने पर ऑनलाइन अपना ई-आधार कार्ड डाउनलोड कर सकते हैं.
मुंबई:

आजच्या काळात (Aadhaar Card) हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट मानले जाते.कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा बँकिंगशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी, आधार कार्ड सर्वत्र आवश्यक आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीही  (Aadhaar Card Online) आवश्यक आहे.

हे ही वाचा : आधार आणि पीएफ खाते लिंक नसल्याचे कारण देत कर्मचाऱ्याला कामावरून काढलं 

तुमचा आधार क्रमांक आठवत नाही? असा परत मिळवा

अनेकदा आधार कार्ड हरवतं.(Aadhaar Card Lost) जेव्हा आधार कार्डाची विचारणा होते तेव्हा ते हरवल्याचं कळतं. आधार नंबर पाठ नसल्याने अडचणी वाढतात.(Aadhaar Number Check) ज्यांना आधार नंबर पाठ असतो ती मंडळी ऑनलाईन सुविधेचा वापर करून आपले आधार कार्ड पुन्हा डाऊनलोड करून घेतात. मात्र ज्यांना हा नंबर माहिती नसतो, किंवा आठवत नसतो तेव्हा त्यांच्यासमोर मोठी पंचाईत निर्माण होते. अशांनी आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आधार नंबर परत मिळवणे अगदी सोपे काम आहे. 

हे ही वाचा: 1 जूनपासून गॅस सिलिंडर, आधार कार्डच्या नियमांमध्ये बदल

आधार नंबर पुन्हा कसा मिळवायचा?  

आम्ही सांगत असलेली पद्धत सोपी असून या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुम्हाला आधार नंबर माहिती नसला तरी तो शोधू शकता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की जो नंब पाठ नाहीये तो मिळवणार तरी कसा ? याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगतो. 

हे ही वाचा : 10 वर्ष जुनं आधार कार्ड मोफत करा अपडेट, वाचा सोपी पद्धत

आधार नंबर मिळवण्याची पद्धत

  • तुमचा आधार क्रमांक परत मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • आता या पृष्ठावर, तुमच्या आधार कार्डवर असलेले नाव, मोबाइल नंबर भरावे लागेल यानंतर CAPTCHA भरावा लागेल.  
  • यानंतर तुम्हाला 'सेंड ओटीपी' चा पर्याय येईल
  • ओटीपीची रिक्वेस्ट पाठवल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल. 
  • ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारशी संबंधित माहिती पुढील पेजवर मिळू शकते.
  • याशिवाय तुम्ही तुमचे आधार कार्ड देखील डाउनलोड करू शकता.
  • जर तुमचा आधार गरजेच्या वेळी उपलब्ध नसेल तर अशा प्रकारे तुम्ही काही मिनिटांत तुमचा आधार क्रमांक शोधू शकता.
     

मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक नसेल तर काय करावे?

जर तुमचा मोबाईल तुमच्या आधार कार्डशी (Aadhar Card Mobile Number Link) लिंक नसेल किंवा तुम्हाला ऑनलाइन पर्याय वापरायचा नसेल, तर तुम्ही आधार नोंदणी केंद्रावर जाऊन तुमच्या आधार कार्डची प्रिंटआउट घेऊ शकता. यासाठी तुम्हाला काही अनिवार्य माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही दिलेली माहिती आणि बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन हे तंतोतंत असेल तर तुम्हाला ई-आधार पत्राची प्रिंट आऊट मिळू शकेल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेची नियुक्ती? RSS-भाजपच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
Aadhaar Card हरवलंय, नंबरही आठवत नाही? या सोप्या ट्रीकने होईल टेन्शन दूर
Woman Dragged By Husband Behind Bike As Punishment Rajasthan Nagaur viral video
Next Article
बायको ओरडत होती, पण नवऱ्यानं ऐकलं नाही...बाईकला बांधून फरफटत नेलं ! Video Viral