Shocking News: एका धक्कादायक घटनेत, भरधाव वेगाने फॉर्च्यूनर एसयूव्ही चालवत असताना एका माजी सरपंचाचा हार्ट अटॅकनं (Heart Attack) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याच्या मध्यभागी कार अचानक डिव्हायडरवर (Divider) चढून दुसऱ्या बाजूला उतरली. सुरुवातीला हा अपघात मद्यधुंद अवस्थेत झाल्याचा संशय स्थानिकांना आला, पण जवळ जाऊन पाहिल्यावर सत्य परिस्थिती समोर आली, ज्यामुळे परिसरातील लोक स्तब्ध झाले.
कुठे घडली घटना?
ही दुर्दैवी घटना राजस्थानमधील (Rajasthan) कोटा शहरानजीकच्या किशोरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. बोराबासचे प्रशासक तथा निवर्तमान सरपंच अर्जुन गुंजल हे त्यांची फॉर्च्यूनर कार चालवत होते. कार डिव्हायडरवर आदळल्याने अपघात झाल्याचे पाहून लोकांनी तात्काळ धाव घेतली. ड्रायव्हर सीटवर गुंजल बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत (Dead) घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अपघातापूर्वी मिळाले होते संकेत पण.....
अर्जुन गुंजल यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे. गुंजल यांचे नातेवाईक भरत गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पूर्णपणे निरोगी (Healthy) होते. मंगळवारी सकाळी ते काही कामासाठी कोटा शहरात आले होते. या घटनेच्या काही तास आधी त्यांना उलटी (Vomiting) झाली होती. तेव्हा त्यांनी ही समस्या गॅसमुळे (Gas Problem) झाली असल्याचे सांगून दुर्लक्ष केले आणि ते पुढे निघाले. एरोड्रम रोडवर हा दुर्दैवी अपघात घडला, जिथे त्यांना स्टेअरिंगवर असतानाच हृदयविकाराचा झटका आला.
( नक्की वाचा : Tiger Attack : बस चुकली अन् वाघाने गाठलं, वरातीला निघालेल्या तरुणांवर जीवघेणा हल्ला, 3 KM रंगला थरारक खेळ )
काही दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस
अर्जुन गुंजल यांनी नुकताच, (10 ऑक्टोबर) त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. वाढदिवसाच्या पार्टीला त्यांचे अनेक मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. भरत गुर्जर यांनी सांगितले की, गुंजल किशोरपुरा येथील त्यांच्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी जात होते. रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा, ज्यामुळे गाडीवरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि फॉर्च्यूनर बेकाबू होऊन डिव्हायडरला धडकली. आसपासच्या लोकांनी त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये पोहोचवले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.