Petrol-Diesel Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर

Petrol and Diesel Prices Hike: मिडिल ईस्ट संकट आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Petrol and Diesel Prices Increase : आंतरराष्ट्रीय स्तरावर 'मिडिल ईस्ट'मधील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या टंचाईमुळे देशात इंधनाचा भडका उडाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या दबावानंतर केंद्र सरकारने पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. गेल्या 10 दिवसांतील ही सलग तिसरी दरवाढ आहे. या ताज्या वाढीमुळे पेट्रोल प्रतिलीटर 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग झाले आहे.

वाढलेले हे नवीन दर आज 23 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात लागू करण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असल्याने रोजच्या गरजेच्या वस्तू आणखी महाग होण्याची भीती वर्तवली जात आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)

मे महिन्यात कधी आणि किती वाढले दर?

16 मे 2026 रोजी तब्बल 4 वर्षांनंतर पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट 3 रुपये प्रतिलीटरची मोठी वाढ करण्यात आली. त्यानंतर 19 मे रोजी दुसऱ्यांदा पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महागले. त्यानंतर आज 23 मे रोजी तिसऱ्यांदा पुन्हा पेट्रोल 87 पैसे आणि डिझेल 91 पैशांनी महाग झाले आहे. एकूण विचार गेल्या काही दिवसांतच पेट्रोल-डिझेलच्या किमती सुमारे 5 रुपये प्रतिलीटरने वाढल्या आहेत.

दरवाढीनंतर पेट्रोलचे आजचे दर 

  • मुंबई: 108.49 रुपये (वाढ: +0.90 पैसे)
  • दिल्ली: 99.51 रुपये (वाढ: +0.87 पैसे)
  • कोलकाता: 110.64 रुपये (वाढ: +0.94 पैसे)
  • चेन्नई: 105.31 रुपये (वाढ: +0.82 पैसे)

(नक्की वाचा-  Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... )

दरवाढीनंतर डिझेलचे आजचे दर

  • मुंबई: 95.02 रुपये (वाढ: +0.94 पैसे)
  • दिल्ली: 92.49 रुपये (वाढ: +0.91 पैसे)
  • कोलकाता: 97.02 रुपये (वाढ: +0.95 पैसे)
  • चेन्नई: 96.98 रुपये (वाढ: +0.87 पैसे)
     
Topics mentioned in this article