
Ganesh Chaturthi 2025: यंदा 27 ऑगस्ट गणेश चतुर्थीला बाप्पाचं आगमन. यानिमित्ताने देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर एक सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव (Cultural and Social Celebration in India) देखील आहे. हा उत्सव प्रत्येक शहरातील रस्त्यांवर, परिसरात आणि मंडपात चैतन्य आणतो. या उत्सवादरम्यान भक्तीगीते, ढोल-ताशांचा गजर आणि भव्य सजवलेले मंडप पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होते.
जर तुम्हालाही या भक्तीमय वातावरणाचा भाग व्हायचे असेल (Best Ganesh Chaturthi Events in India 2025) आणि अशी ठिकाणं शोधत असाल जिथे हा उत्सव भव्य पद्धतीने साजरा केला जातो. तर ५ शहरे (Top 5 Cities For Ganeshotsav 2025) तुम्ही पाहायला हवीत. येथील स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा अनुभव देखील घेता येईल.
गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेली टॉप 5 शहरं (Best Places For Amazing Ganeshotsav)
नक्की वाचा - Ganesh Chaturthi 2025 : दुकानातून मूर्ती खरेदी करताना आधीच पाहून घ्या 'या' गोष्टी, अन्यथा पश्चाताप होईल!
1 मुंबई
मुंबईचा गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. येथील भव्य आणि रंगीबेरंगी गणेशमूर्ती अख्खं शहर सजवतात. या काळात दिवस-रात्र मुंबई जागी असते. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बाप्पाचे विसर्जनादरम्यानचं दृश्य प्रत्येक भक्ताला मंत्रमुग्ध आणि भावनिक करतं. शहराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात आयोजित मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीत महोत्सव या उत्सवाला आणखी चैतन्यशील बनवतात. येथील काही प्रसिद्ध गणेश मंडळे म्हणजे लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा (मुंबईचा राजा) आणि जीएसबी सेवा मंडळ.
2 गोवा
समुद्रकिनारी वसलेले गोवा मुंबईच्या जवळ आहे. ते केवळ समुद्रकिनारे आणि पार्ट्यांसाठीच नाही तर गणेशोत्सवासाठी देखील ओळखले जाते. येथे लोक त्यांच्या घरात गणपतीच्या मूर्ती स्थापित करतात आणि पूजा करतात. संगीत आणि नृत्याच्या आयोजनाने हा उत्सव आणखी चैतन्यशील होतो. समुद्रकिनारी आयोजित होणाऱ्या उत्सवाचा अनुभव अधिक संस्मरणीय बनवतो.
3 हैदराबाद
हैदराबादमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह खूप मोठा असतो. या काळात संपूर्ण शहर चैतन्यमय असते. खैरताबाद येथील विशाल गणेश आणि बालापूर, गौलीपुरा आणि कमला नगर सारख्या शहरातील इतर मंडळांचे दर्शन घेण्यासाठी भाविक लांबून येतात. येथील सजावट, मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे हा उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी असते.
4 दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीत गणेशोत्सवाचा माहोल गल्ल्या गल्ल्यांमध्येही दिसते. मोठमोठ्या सार्वजनिक मंडळामध्ये पूजा-अर्चा केली जाते. सोबतच लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात.
5 कोलकाता
कोलकातामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नाही, परंतु तो स्थानिक संस्कृती आणि परंपरांनी परिपूर्ण आहे. शहरातील लहान-मोठी मंडळ विविध पद्धतीने सजावट करुन उत्सवाला खास बनवतात. लोक पारंपारिक पद्धतीने पूजा करतात आणि संपूर्ण उत्सवाचा आनंद घेतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world