
Ganesh Chaturthi 2025 : हिंदू धर्मानुसार, गणेशाची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात. बाप्पा घरात येताच सुख-समृद्धी येते. गणपतीच्या पूजेच्या महापर्वाची भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या चतुर्थीपासून सुरुवात होते आणि दहा दिवस हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. हा मंगलपर्व साजरा करण्यासाठी देशभरात गणेश भक्त वर्षभर वाट पाहतात. तुम्हीही या वर्षी आपल्या घरात गणपतीची प्राण प्रतिष्ठा करणार असाल तर काही वास्तू नियमांबद्दल नक्की जाणून घ्या. (keep in mind before purchasing Ganpati idol)
हिंदू मान्यतेनुसार, प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आणि जसं जमेल तसं गणपतीची आराधना करतो. जो मानसिक शांती शोधत असेल तर तो बाप्पाच्या ध्यानस्थ स्थितीतील गणेशाच्या मूर्तीची (Vastu Rule) पूजा करतो. जर कोणाला कलेची साधना करावयाची असेल तर तो वाद्य वाजवत असलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करतो. परंतु जर आपण पारंपारिक मूर्तींबद्दल बोलत असू तर त्याची रचना आणि रंग यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. गणेश पूजेसाठी कोणती मूर्ती सर्वात शुभ मानली जाते ते जाणून घेऊया.
नक्की वाचा - Ganesh Chaturthi 2025 :बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी गुरुजी भेटत नाहीये? घरच्या घरीच करा पूजा, पाहा हे 3 Video
बाप्पाची मूर्ती कशी असायला हवी? (Ganesh idol as per Vastu)
हिंदू मान्यतेनुसार, डाव्या सोंडेंच्या गणपतीच्या मूर्तीची पूजा शुभ मानली जाते. घरी पूजेसाठी बसलेली मूर्ती निवडा. त्यात वाहन उंदीर असेल याची खात्री करा. प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी, नेहमी मातीची मूर्ती खरेदी करा. ज्यामुळे नंतर तुम्ही ती मूर्ती घरातच एखाद्या बादलीत विसर्जित करू शकता. आणि त्यातील माती झाडांच्या कुंडीत टाकू शकाल. अशा मूर्ती पर्यावरणपूरक असतात. जर तुम्ही घरी गणपतीची पूजा करत असाल तर शास्त्रात सांगितल्यानुसार, तुम्ही नेहमी लहान मूर्तीची पूजा करावी. ती केवळ मंदिरात ठेवण्यासाठीच नाही तर पूजेसाठी देखील योग्य असेल.
कोणत्या रंगाची मूर्ती खरेदी कराल?
तुम्ही तुमच्या आवडीनुसार, पांढरी, लाल, पिवळी, सिंदूरी, हिरवा, सोनेरी इत्यादी रंगांची मूर्ती खरेदी करू शकता. जर तुम्ही लाल, पिवळा आणि सिंदूर रंगाचे मिश्रण असलेली मूर्ती निवडली तर ती अत्यंत शुभ ठरेल. काळा किंवा निळा रंग जास्त असलेली मूर्ती खरेदी करणं टाळा.
घरात गणेशाची किती मूर्ती असाव्यात?
वास्तूशास्त्रानुसार, घरात कधीही विषम संख्येत गणपतीची मूर्ती असू नये. हिंदू मान्यतेनुसार, घरात तीन गणेशाची मूर्ती शुभ मानली जात नाही. शक्य असेल तर नेहमी गणपतीची एकच मूर्ती ठेवावी,आणि त्याची विधीनुसार पूजा करावी.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world