- गिग वर्कर्स यूनियन ने 25 और 31 दिसंबर को अखिल भारतीय हड़ताल का आह्वान किया है
- Zepto, Blinkit, Swiggy, Amazon और Flipkart जैसे क्विक कॉमर्स प्लेटफॉर्म के कर्मचारियों भी हड़ताल में शामिल
- डिलीवरी कर्मचारियों की मांगों में असुरक्षित दस मिनट की डिलीवरी मॉडल को हटाना और बेहतर वेतन शामिल हैं
नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच ऑनलाइन शॉपिंग आणि फूड डिलिव्हरी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. Zepto, Blinkit, Swiggy आणि Zomato सारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी (गिग वर्कर्स) 31 डिसेंबर रोजी संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे 31 डिसेंबरच्या रात्री तुमचे फूड किंवा किराणा मालाचे ऑर्डर वेळेवर मिळणे जवळपास अशक्य होणार आहे.
संपाचे मुख्य कारण काय?
'भारतीय संघ ऑफ ॲप-आधारित परिवहन श्रमिक' (IFAT) नुसार, हे कामगार खालावलेल्या कामाच्या परिस्थितीमुळे आणि कमी वेतन दरामुळे संतप्त आहेत. त्यांच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
- वाढत्या महागाईच्या तुलनेत डिलिव्हरी चार्जेस किंवा पगारात वाढ न मिळणे.
- 10 मिनिटांत डिलिव्हरी देण्याच्या दबावामुळे होणारे अपघात आणि मानसिक ताण. हे मॉडेल बंद करण्याची मागणी कर्मचारी करत आहेत.
- कामाच्या वेळी होणाऱ्या अपघातांसाठी पुरेशा आरोग्य विम्याची तरतूद नसणे.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)
सेवेवर काय परिणाम होणार?
या संपामध्ये केवळ स्विगी किंवा झोमॅटोच नाही, तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचे कर्मचारीही सहभागी होणार असल्याचा दावा युनियनने केला आहे. गुरुग्राममधील अनेक भागांत आधीच 'क्विक डिलिव्हरी' सेवा विस्कळीत झाली असून, अनेक ऑर्डर्स रद्द केल्या जात आहेत.
(नक्की वाचा- समृद्धी महामार्ग आजपासून 3 दिवस टप्प्याटप्प्याने बंद राहणार; कुठे-कुठे आणि कधी असणार ब्लॉक?)
कोणत्या शहरांना बसणार फटका
मुंबई, पुणे, दिल्ली आणि बंगळुरू सारख्या शहरांमध्ये 31 डिसेंबरला सर्वाधिक ऑर्डर्स असतात. संपामुळे या 'बल्क ऑर्डर्स' वेळेवर पोहोचवणे कंपन्यांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
तुम्ही ऑर्डर केली तरी ती वेळेत न पोहोचल्याने तुमची नवीन वर्षाची पार्टी विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला नवीन वर्षाच्या पार्टीसाठी काही सामानाची किंवा अन्नाची गरज असेल, तर 31 डिसेंबरच्या संध्याकाळची वाट न पाहता आदल्या दिवशी किंवा सकाळीच तयारी करून ठेवा.