जाहिरात

समृद्धी महामार्ग उद्यापासून 3 दिवस टप्प्याटप्प्याने बंद राहणार; कुठे-कुठे आणि कधी असणार ब्लॉक?

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर 'हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' अंतर्गत 'गॅन्ट्री' बसवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (MSRDC) घेतले आहे. हे काम 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्ग उद्यापासून 3 दिवस टप्प्याटप्प्याने बंद राहणार; कुठे-कुठे आणि कधी असणार ब्लॉक?

अमोल सराफ, बुलडाणा

Samruddhi Mahamarg: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वाहतूक दिनांक 27 ते 29 डिसेंबर दरम्यान विविध टप्प्यात तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. विविध टप्प्यात हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गावर 'हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' अंतर्गत 'गॅन्ट्री' बसवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (MSRDC) घेतले आहे. हे काम 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे. हे काम पाच टप्प्यात होणार असून चॅनेल104 आणि 80 व चॅनेल 130 ते 300 दरम्यान अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे ते चांदुर रेल्वे तालुक्यातील हे काम आहे.

काम सुरू असलेल्या ठिकाणाजवळील संबंधित कॉरिडोरवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्यात येईल. या गॅन्ट्रीच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण, वेग नियंत्रण, आपत्कालीन सूचना तसेच विविध तांत्रिक प्रणाली प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे.

(नक्की वाचा-  Nanded News: आई-वडिलांनी खाटेवरच जीव सोडला, मुलांचे रेल्वे ट्रॅकवर मृतदेह सापडले; नांदेडमध्ये भयंकर घडले)

वाहतूक कधी आणि कुठे बंद ठेवण्यात येईल?

  • मुंबईच्या दिशेने नगरगावंडी

वेळ- 27 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 3 वाजता किंवा दुपारी 3 ते 4 वाजता

  • मुंबईच्या दिशेने नगरगावंडी

वेळ- 27 डिसेंबर दुपारी 2 ते 3 वाजता किंवा दुपारी 3 ते 4 वाजता

  • नागपूरच्या दिशेने नगरगावंडी

वेळ- 28 डिसेंबर दुपारी 2 ते 3 वाजता किंवा दुपारी 3 ते 4 वाजता

  • नागपूरच्या दिशेने टिटवा

वेळ- 29 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 12 किंवा दुपारील 12 ते दुपारी 1 वाजता

  • मुंबईच्या दिशेने टिटवा

वेळ- 29 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 12 वाजता किंवा दुपारी 12 ते 1 वाजता

(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)

दरम्यान या कामासाठी नगरगांवडी, टिटवा या गावातील वाहतूक बंद राहणार आहे. या प्रत्येक टप्प्यादरम्यान कामाच्या टप्प्यानजीक संबंधित वाहिनीवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांकरता पूर्णतः थांबवण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यावर द्रुतगती मार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल. वाहन चालक आणि आपल्या प्रवासाची नियोजन त्यानुसार करावं. आपत्कालीन वाहतूक थांब्यादरम्यान सहकार्य करावे असं आवाहन MSRDC कडून करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com