पश्चिम बंगालमध्ये भीषण दुर्घटना, मालगाडीची कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक; 9 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंगमध्ये एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

Kanchenjunga Express Train Accident: पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंगमध्ये एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे. जलपाईगुडी परिसरामध्ये एका मालगाडीची कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक बसली. अपघातग्रस्त एक्सप्रेस सियालदाहच्या दिशेने प्रवास करत होती. हा अपघात इतका भीषण होता की कांचनजुंगा एक्सप्रेसच्या कित्येक डबे रुळावरून खाली उतरले आहेत, तर काही डबे ट्रेनच्या डब्यांवर चढले. दुर्घटनेमध्ये 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया 'X'वर शोक व्यक्त केला आहे.

(ट्रेडिंग न्यूज : सिक्कीममध्ये 1200 पर्यटक अडकले, महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश; मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश)

#WATCH | West Bengal | Wagon of Kanchenjunga Express train suspended in the air after a goods train rammed into it at Ruidhasa near Rangapani station under Siliguri subdivision in Darjeeling district today; rescue operation underway pic.twitter.com/rYnEfC3vic

— ANI (@ANI) June 17, 2024

ममता बॅनर्जी यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत म्हटले की, "दार्जिलिंग जिल्ह्यातील फांसीदेवा परिसरात झालेल्या रेल्वे दुर्घटनेबाबतीच माहिती समजल्यानंतर धक्का बसला आहे. बचाव आणि वैद्यकीय मदतीसाठी डीएम, एसपी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. आम्ही युद्धपातळीवर मदत कार्य सुरू केली आहे".

Advertisement

(ट्रेडिंग न्यूज : मित्रांची मस्ती जिवावर बेतली; नवी मुंबईत अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू)

#WATCH | Goods train rams into Kanchenjunga Express train in Darjeeling district in West Bengal, several feared injured

Details awaited. pic.twitter.com/8rPyHxccN0

— ANI (@ANI) June 17, 2024

(ट्रेडिंग न्यूज : नागपुरात बस-रिक्षाच्या भीषण अपघातात 2 जवानांचा मृत्यू, चौघांवर रूग्णालयात उपचार सुरू)

West Bengal CM Mamata Banerjee says Kanchenjunga Express train has been hit by a goods train in Darjeeling district; disaster teams rushed to the site for rescue operations

Details awaited. pic.twitter.com/vU5fN44qH6

— ANI (@ANI) June 17, 2024

#WATCH | Kanchenjunga Express train rammed by a goods train at Ruidhasa in Darjeeling district of West Bengal; Police team present at the spot, rescue work underway pic.twitter.com/Y3UsbzPTxs

— ANI (@ANI) June 17, 2024

Advertisement

कांचनजुंगा एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीने सिग्नल ओलांडून कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक दिली. एनडीआरएफ, विभागीय टीम आणि 15 रुग्णवाहिका प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

#WATCH | Sealdah Eastern Railway sets up a control desk at Rangapani station after the Kanchenjunga Express train rammed by a goods train at Ruidhasa in Darjeeling district of West Bengal

Senior Ticket Collector, Raju Prashad Yadav says, "We haven't received any calls yet. Two… pic.twitter.com/TgBkiJsp9P

— ANI (@ANI) June 17, 2024

Advertisement

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केले की, "NFR झोनमध्ये दुर्दैवी अपघात घडला. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे, NDRF आणि SDRF बचावकार्य करत आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत."

Union Railway Minister Ashwini Vaishnaw tweets, "Unfortunate accident in NFR zone. Rescue operations going on at war footing. Railways, NDRF and SDRF are working in close coordination. The injured are being shifted to the hospital. Senior officials have reached the site." https://t.co/YA9oryGay5 pic.twitter.com/bYdVWNDt4U

— ANI (@ANI) June 17, 2024

"परिस्थिती गंभीर आहे. मालगाडी कांचनजुंगा एक्स्प्रेसला धडकल्याने ही घटना घडली," अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिषेक रॉय यांनी दिली.

Kanchanjunga Express: मालगाडीची कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक; आठवड्याच्या सुरुवातीला भीषण दुर्घटना  

Topics mentioned in this article