जाहिरात
Story ProgressBack

सिक्कीममध्ये 1200 पर्यटक अडकले, महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश; मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश

गेल्या दोन दिवसांपासून सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Read Time: 2 mins
सिक्कीममध्ये 1200 पर्यटक अडकले, महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश; मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश
गंगटोक:

सिक्कीममधील मंगन जिल्ह्यातील लॅच्युन्ग व्हॅली येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर दरड कोसळल्याने अनेक राज्यातील पर्यटक अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीमुळे शहरातील पायाभूत सोयीसुविधांचं नुकसान झालं आहे. यामुळे विविध भागातील वीज, खाद्य पुरवठा आणि मोबाइल नेटवर्कवर परिणाम झाला आहे. भूस्खलन झाल्याने लाचुंग शहरातील 15 परदेशींसह 1200 हून अधिक पर्यटक अडकले आहेत. अडकलेल्या पर्यटकांना लांगुंच शहरातील विविध हॉटेलांमध्ये राहण्याची व्यवस्था आणि स्वस्तात जेवणाची सोय करण्यात आल्याची माहिती आहे. 

सकाळी महाराष्ट्रातील पर्यटक सिक्कीममध्ये अडकल्याचं वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेऊन राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे निर्देश राज्य प्रशासनाला दिले. त्यामुळे या सर्व पर्यटकांना वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने गंगटोक येथे सुरक्षितस्थळी हलवण्यात येणार आहे.

सिक्कीम येथे झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे तेथील स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ही बातमी मुख्यमंत्र्यांना माध्यमांद्वारे समजली. त्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून अडकलेल्या सर्व पर्यटकांना राज्य शासनामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वतः सिक्कीम सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून राज्यातील पर्यटकांना मदत मिळवून देण्याची विनंती केली. तसेच तिथे अडकलेल्या पर्यटक सुनीता पवार यांच्याशीदेखील त्यांनी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला, तसेच त्यांना लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देऊन धीर दिला.

नक्की वाचा - नागपुरात बस-रिक्षाच्या भीषण अपघातात 2 जवानांचा मृत्यू, चौघांवर रूग्णालयात उपचार सुरू

सिक्कीममधून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व पर्यटक हे सध्या सुरक्षित असून त्यांच्यापर्यंत सर्व मदत पोहोचवण्यात येत आहे. तसेच त्यांना तिथून सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले असून उद्या वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांना गंगटोक येथे सुरक्षितस्थळी आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मदतकार्यावर मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत. यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारीदेखील या पर्यटकांशी सतत संपर्कात आहेत. त्यांच्याशिवाय अजून कुणीही सिक्कीममध्ये अडकले असल्यास त्यांनी त्वरित राज्य शासनाला संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.


 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Highlights: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत पाणी पातळीत घसरण
सिक्कीममध्ये 1200 पर्यटक अडकले, महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश; मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश
Goods train rams into Kanchenjunga Express train in Darjeeling district in West Bengal
Next Article
पश्चिम बंगालमध्ये भीषण दुर्घटना, मालगाडीची कांचनजुंगा एक्सप्रेसला धडक; 9 जणांचा मृत्यू
;