जाहिरात

नागपुरात बस-रिक्षाच्या भीषण अपघातात 2 जवानांचा मृत्यू, चौघांवर रूग्णालयात उपचार सुरू

नागपूर जिल्ह्यातील कन्हानजवळील पुलावर बसची धडक लागून 18 जून रोजी सायंकाळी हा अपघात झाला.

नागपुरात बस-रिक्षाच्या भीषण अपघातात 2 जवानांचा मृत्यू, चौघांवर रूग्णालयात उपचार सुरू
नागपूर:

भारतीय सैन्याचे सहा जवान प्रवास करीत असलेल्या ऑटो रिक्षाच्या अपघातात दोन जवानांना मृत्यू झाला असून अन्य चार जवान जखमी आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

नागपूर जिल्ह्यातील कन्हानजवळील पुलावर बसची धडक लागून 18 जून रोजी सायंकाळी हा अपघात झाला. यात आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार दोन जवानांचा मृत्यू झाला असून अन्य चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर कामठीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे जवान एका तीन चाकी ऑटो रिक्षात बसून कामठी कॅन्टोन्मेंटकडे जात  असताना एका बसने धडक दिल्याने ऑटो रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला. साध्या वेशात असलेल्या जखमी जवानांना आसपासच्या लोकांनी ऑटो रिक्षा मधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. रस्त्यावर बस चालकाच्या आणि ऑटो चालकाच्या निष्काळजीपणा मुळे हा दुर्दैवी अपघात घडला असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

बातमी अपडेट आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
'बदलापूरच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या' कोणी केली मागणी?
नागपुरात बस-रिक्षाच्या भीषण अपघातात 2 जवानांचा मृत्यू, चौघांवर रूग्णालयात उपचार सुरू
sangali miraj young man attacks by Sharp weapon because insta story
Next Article
इंस्टावर स्टोरी का बघतोस? आधी दमबाजी मग कोयत्याने वार, नक्की काय घडलं?